Politics News कर्नाटक : कर्नाटकातील माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कर्नाटकात निवडणुकांची तयारी सुरू असतानाच हा भाजपाला धक्का मानला जात आहे. हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघाचे आमदार असलेल्या शेट्टर यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी रविवारी विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला होता. आज बंगळुरूत त्यांचा जाहीररित्या पक्षप्रवेश झाला.
नाराज होऊन काँग्रेसमध्ये प्रवेश…!
गेल्या काही दिवसांपासून भाजपामध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यापाठोपाठ कर्नाटकातील माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या सहा वेळेपासून हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघाचे आमदार असलेले जगदीश शेट्टर यांना आगामी निवडणुकीसाठी भाजपाने संधी दिली नाही, त्यामुळे नाराज होऊन त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
‘मी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा विचार केला आहे. मी मनावर दगड ठेवून पक्षाचा राजीनामा देत आहे. मी तोच आहे ज्याने पक्ष तयार केला आणि उभा केला आहे. पण पक्षातील काही नेत्यांनी मला पक्षाचा राजीनामा देण्यास भाग पाडलं आहे’, अशी प्रतिक्रिया जगदीश शेट्टर यांनी उमेदवार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दिली होती. त्यानंतर आज त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Politics :राज्याच्या राजकारणात 2 बॉम्बस्फोट होणार’; प्रकाश आंबेडकरांनी केला मोठा दावा
Politics : अजित पवार यांच्याकडून जीवाला धोका; भाजप पदाधिकाऱ्याने केली पोलिसांत तक्रार..!