Politics News मुंबई : राज्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस कधीही न विसरण्यासारखा आहे. पहाटेचा शपथविधी अयशस्वी झाल्यानंतर आज अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. (Politics News) काल परवापर्यंत भाजपावर ताशेरे ओढणाऱ्या नेत्यांचं घुमजाव पाहून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. (Politics News) इतकंच काय तर शरद पवार यांच्या देवेंद्रवासी या वक्तव्याचाही खरपूस समाचार घेतला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या छगन भुजबळ यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरील तो व्हिडीओ चर्चेत आला आहे. (Politics News)
गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दणका देत संपूर्ण शिवसेना आपल्यासोबत उभी केली. ४० आमदारांसह भाजपाशी युती करत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. या घडामोडीला वर्ष पूर्ण झालं असताना राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांनी पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना गटाशी सलगी केली आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
राज्यपाल रमेश बैस यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देली. यावेळी त्यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे व अनिल पाटील यांना देखील मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.
छगन भुजबळ यांनी ट्विटमध्ये म्हटल्यानुसार, “जाती जातीमध्ये, धर्मा धर्मामध्ये भांडणं लावायचं काम सुरु आहे. ठराविक लोक मुद्दाम काहीतरी करतात आणि अल्पसंख्यांक हे करत आहेत. म्हणून अल्पसंख्याकांच्या विरुद्ध बहुसंख्याकांना उठवतात आणि दंगे कसे होतील ते पाहतात. निवडणुकांपर्यंत जे आहे. हे सगळे दंगे जे आहेत, हे वाढविण्याचं काम या महाराष्ट्रात होणार आहे. कदाचित या देशात होणार आहे. आज आपण या गोष्टींना अजिबात बळी पडता कामा नये.”