Political News : मुंबई राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करून सत्ताधारी भाजप-शिवसेनेशी हातमिळवणी केल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलत आहेत. अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीकडे असलेले विरोधीपक्षनेतेपद काँग्रेसकडे जाणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. आता काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी सुनील केदार, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर आणि संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा आहे.(Political News)
राज्यातील राजकीय समीकरणे बदलत आहेत.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून बंड केलं, राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचं संख्याबळ कमी झाल्यानं काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यात आला आहे. काँग्रेसमधून कोणाला संधी मिळणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.(Political News) यातच आता सुनील केदार, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर आणि संग्राम थोपटे या काँग्रेस नेत्यांच्या नावाची विरोधीपक्ष नेतेपदासाठी चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
आता विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान दुसरीकडे नाना पटोले हे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कायम राहणार आहेत, तर बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचे गटनेते राहणार आहेत, त्यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याची माहिती समोर येत आहे.(Political News)