Political News शिरूर : राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षात फुट झाल्यावर राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा दंड थोपटून पुन्हा जनतेत जाणार, जनतेवर विश्वास, जे सोडून गेले त्यांना ईडीचे भय दाखविण्यात आले असल्याचे सांगितले. असे असताना आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना मात्र कॅबीनेट मंत्री पद मिळाले आहे. (Political News) त्यामुळे रांजणगाव गणपती ( ता. शिरूर ) येथे राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षातिल कार्यकर्त्यांनी पेढे भरवून व फटाक्यांची आतषबाजी केली आहे. असे आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी सांगितले. यामुळे नेमक कोण कोणाच्या राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचा याचा संभ्रम निर्माण झाला आहे. (Political News)
राज्यात पहाटे झालेला शपथविधी लक्षात घेता आता पुन्हा दुपारचा झालेला शपथविधी देखील गाजलेला पहावयास मिळाला आहे. रवीवार ( ता. २ ) दुपारी माजी विरोधीपक्षनेते अजीत पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेत पुन्हा शपयविधी घेतला. यामध्ये राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे दिग्गज नेत्यांनी भाजप पक्षाच्या मंत्रीमंडळात तिसऱ्या इंजीनची भूमिका घेतली आहे.
कॅाग्रेस पक्षाचे जेष्ट नेतृत्व म्हणून वळसे पाटील यांच्याकडे पाहिले जाते. वळसे पाटील यांच्या पक्षनिष्टते बरोबर पवार यांच्या एकनिष्टतेचे गुणगान गायले जाते. फडणविस- शिंदे सरकार बरोबर आता अजीत दादांचा राष्ट्रवादी पक्षाचा गट गेला आहे. अभ्यासू, कार्यकूशल नेतृत्व म्हणून ओळख असणारे वळसे पाटिल देशाचे नेते शरद पवार यांना सोडून त्यांनी अजीत पवार यांच्या बरोबर जाण्याचे का ठरविले. असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कार्यकत्यांमध्ये आपन कोणत्या विचाराचे असा प्रश्न पुढे येऊ लागला आहे.
राज्याचे राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे प्रमुख नेतृत्व जेष्ट नेते शरद पवार म्हणाले की, कोण कुठे गेले याची मला त्याची चिंता नाही. मी जनतेवर विश्वास ठेवणारअसून पुन्हा जनतेत जाणार जनतेवर माझा विश्वास आहे. फक्त पक्ष म्हणून शरद पवार यांच्या वर विश्वास असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यामुळे मी कोणा बरोबर ? असा प्रश्न राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी चे दर्शन घेऊन पुन्हा पक्षाच्या एकजूटीसाठी जनतेत जाणार असल्याचे पवार यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
शिवसेनेत फुट पडल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांममध्ये मी कोणाचा ? मी कोणा बरोबर जाणार ? असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे असे शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले होते. पण राज्याच्या संत्तातराच्या घटना व मंत्री पदाचा शपथविधी यामधून राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजीत पवार असे दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यापुढे राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षात तुम्ही कोणाच्या विचाराचे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो.
या बाबत आंबेगाव – शिरूर विधानसभेचे राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर म्हणाले की,राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाने जनतेच्या कल्याणासाठी विचारपुर्वक निर्णय घेतला आहे. आम्ही राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाबरोबर असून जेष्ट नेते शरद पवार, पक्षाचे अध्यक्षा सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजीत पवार तसेच कॅबिनेट मंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या विचाराचे कार्यकर्ते आहोत.
रांजणगाव ( ता. शिरूर ) येथे राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांना पेढे भरवून व फटाक्याची आतषबाजी करत या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य आबासाहेब कोहकडे यांच्या समवेत गावगावचे सरपंच व कार्यकर्ते उपस्थित होते.