Political News : मुंबई : आदित्य ठाकरे यांचे खास मित्र आणि युवा सेना कार्यकारिणी सदस्य राहुल कनाल हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला जय महाराष्ट्र करून १ जुलै रोजी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. काही दिवसांपूर्वी आयकर विभागाच्या पथकाने राहुल कनाल यांच्या घरी छापा मारला होता, पण त्यात काही निष्पन्न झालं नव्हतं. या परिस्थितीत देखील राहुल कनाल यांनी आदित्य ठाकरेंची साथ सोडली नव्हती. मात्र, कनाल युवासेनेत नाराज असल्याची चर्चा होती. पक्षातील अंतर्गत कुरघोडींना कंटाळून अखेर कनाल बाहेर पडल्याची चर्चा आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जाते.(Political News)
ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जाते.
दरम्यान, राहुल कनाल यांनी महिनाभरापूर्वीच युवासेना कार्यकारिणीचा व्हॉट्सअॅप ग्रूप सोडला होता. शिवसेनेत येण्यापूर्वी ते काँग्रेसमध्ये कार्यरत होते. कनाल युवासेनेत नाराज असल्याची चर्चा होत होती. अखेर आदित्य ठकरे राजकारणात व्यग्र असल्याचा फायदा घेत काही युवासेना पदाधिकारी आपल्याला डावलत असल्याचा आरोप करत कनाल यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला.(Political News)
यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या युवासेना कोअर कमिटीतील पूर्वेश प्रताप सरनाईक, समाधान सदा सरवणकर, योगेश रामदास कदम, सिद्धेश कदम, अमेय घोले यांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.(Political News) त्यानंतर आता कनाल ठाकरे गटाची साध सोडणार आहेत. दरम्यान, राज्याच्या उत्तुंग विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे राहुल कनाल यांनी म्हटले आहे. पक्षात स्वाभिमान टिकवण्यासाठी कनाल ठाकरेंची साथ सोडत असल्याचे बोलले जात आहे.(Political News)
आदित्य ठाकरेंच्या कोअर कमिटीतील जबाबदार आणि ठाकरे यांची विश्वासू व्यक्ती म्हणून कनाल यांची ओळख होती. ते मुंबई महापालिकेत स्वीकृत सदस्य होते. त्यांना युवा सेनेचे सक्रिय पदाधिकारी मानले जात होते. महाविकास आघाडीची सत्ता असताना शिर्डी देवस्थान समितीवर ते सदस्य होते. त्यामुळे कनाल यांचे सोडून जाणे ठाकरे गटासाठी धक्का असल्याचे मानले जात आहे.(Political News)
दरम्यान, ठाकरे कुटुंबियांकडून कनाल यांना समजावण्याचा प्रयत्न झाला, परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. सध्याच्या राजकीय वातावरणात पक्षाला राहुल कनाल सारख्या युवा पदाधिकाऱ्यांची गरज असल्याचं बोललं जात आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश चालू असताना जुने सहकारी मात्र दुरावले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.(Political News)
ठाकरे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी १८ जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी राजकीय वर्तुळात अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. मात्र, शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर विधानपरिषद सदस्या व शिवसेना पक्षप्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली होती. आता कनाल पक्षांतर्गत कुरघोड्यांना कंटाळून पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत.(Political News)
या पार्श्वभूमीवर युवा सेनेची जबाबदारी असलेले आदित्य ठाकरे पक्षाच्या कोअर कमिटीत कोणते बदल करणार आहेत, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.(Political News)