दीपक खिलारे
इंदापूर : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (ता.१२) इंदापूर येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पुणे जिल्हा संघटिका सीमा कल्याणकर यांनी दिली.
माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या सूचनेनुसार, जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे जिल्हाप्रमुख व महारूद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांची शिवसेना पुणे जिल्हा यांच्या वतीने या आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या आरोग्य शिबीरात मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप करण्यात येणार असून मोतीबिंदू शस्त्रक्रिया त्याचबरोबर आर्थिक दुर्बल घटकातील रूग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत केली जाणार आहे.
या शिबीरात सहभागी होण्यासाठी संबंधित रुग्णांनी ९८५०००१७५५ व ९७३०७९००२८ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा संघटिका सीमा कल्याणकर व शहराध्यक्ष अशोक देवकर यांनी केले आहे.