Nitesh Rane अहमदनगर : येथे व्यापाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यावरुन भाजप आमदार नितेश राणे Nitesh Rane आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यात शीतयुद्ध सुरु आहे.
उगाच माझ्या नादाला लागू नका. 2024 जवळ आहे, आमदारांचा जो कार्यक्रम करायचा आहे तो एकदाच करून टाका. मी स्वतः प्रचाराला येणार आणि एकदाच या लोकांना हिंदूंची ताकद दाखवणार आहे, असा पलटवार नितेश राणे यांनी संग्राम जगताप यांच्यावर केला आहे.
आमदार संग्राम जगताप यांच्यावर टीका…!
अहमदनगरला काही दिवसांपूर्वी शहरातील कापड बाजारातील व्यापाऱ्यावर झालेल्या हल्ल्या प्रकारणी नितेश राणे यांनी भेट घेतली होती. यावेळी राणेनी आक्रमक होत हल्ला करणाऱ्या आरोपींना इशारा दिला होता. तसेच स्थानिक आमदार संग्राम जगताप यांच्यावर टीका केली होती. राणे म्हणाले होते की, स्थानिक आमदार माझ्या नजरेला नजर भिडवू शकत नाही. त्यावर नितेश राणे यांची उंची माझ्या शर्टाच्या गुंडी एवढी आहे. त्यामुळे त्यांच्या नजरेशी नजर भिडवता येत नाही, अशी खिल्ली जगताप यांनी उडवली होती. त्यावर आता नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे