(Nashik News) नाशिक : सुभेदार मल्हारराव होळकर यांनी आपल्या पराक्रमाने, कसलीही घराणेशाहीची परंपरा नसतांना स्वबळावर पुढे येत मराठेशाहीचे मुख्य आधारस्तंभ बनले. ते एक धोरणी, मुत्सद्दी व शिवरायांच्या गनिमी काव्याला अंगीकारणारे सेनानी होते. अंगी गुण असले, वीरश्री असली तर एक सामान्य मुलगा इतिहासाल घडवणारा महानायक कसा बनू शकतो. हे मल्हाररावांनी सिद्ध करून दाखवले आहे. असे मत प्रा.यशपाल भिंगे यांनी केले.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा…!
सुभेदार मल्हारराव होळकर जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन नाशिकच्या तुळजाभवानी मैदानावर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने करण्यात आला होता. यावेळी प्रा.भिंगे बोलत होते. शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे, ओबीसी तथा जेष्ठ धनगर समाज नेते प्रकाश शेंडगे, प्रहारचे जिल्हा चिटणीस समाधान बागल, खंडेराव पाटील, शिवाजी ढेपले, दत्तू बोडके, विनायक काळदाते, शरद शिंदे, देविदास भडांगे, बापूसाहेब शिंदे, अरुण शिरोळे, शिवाजी ढगे, राजाभाऊ पोथारे, भाऊलाल तांबडे, लक्ष्मण बर्गे व हजारो होळकर प्रेमी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
भिंगे म्हणाले की, ”होळकर घराण्याची स्थापना करणारे मल्हारराव होळकर हे अटकेपार झेंडा रोवाण्यापासून ते पानिपतच्या निर्णायक लढाई पर्यंत मराठा साम्राज्यासाठी लढत राहिले. इतिहासात त्यांचं नाव अजरामर आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीचा महाराष्ट्र व नंतरचा महाराष्ट्र आणि स्वराज्याच्या विस्तारात सुभेदार मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योगदान महत्वाचे आहे.”
दरम्यान, सुभेदार मल्हारराव होळकर जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी तुळजाभवानी मैदानावर येळकोट येळकोट जय मल्हारचा निनाद घुमला. तसेच यावेळी आनंद ठाकूर यांनी भरवलेल्या होळकरशाहीचे शस्त्र प्रदर्शन भरवले. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर एकपात्री नाटक स्वाती गजबार यांनी केले. प्रास्ताविक रामदास काळे यांनी केले.
या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्षा सोनाली पोटे, उपाध्यक्ष अण्णासाहेब सपनार, नवनाथ शिंदे, राजाभाऊ बधाड, देवराम रोकडे, बाबुराव हिंगे, विजय चितळकर, वैभव रोकडे, हेमंत शिंदे, भूषण जाधव, संदेश मोरे यांनी यांनी केले.