Mumbai news : मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर आज मुंबईमध्ये झालेल्या सभेत जोरदार भाषणबाजी करत, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजकारणाची पोलखोल केली. आता वय झालयं, तुम्ही आराम करा… आम्हाला आशीर्वाद द्या… असं म्हणतं निवृत्तीचा सल्लाही दिला. अजित पवार यांच्या या भाषणाची शरद पवार यांनीही चिरफाड केली. जे गेले त्यांना सुखात राहू द्या. महाराष्ट्रात नवीन कर्तृत्वान पिढी तयार करू, असं सांगत अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, असं आवाहनही शरद पवार यांनी केलं.
यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याला संबोधित करताना शरद पवार बोलत होते. चिन्ह कुठे जाणार नाही. चिन्ह काही निवडणूक ठरवत नाही. (Mumbai news) माझा अनुभव आहे. गाय वासरू, बैलजोडी, चरखा, पंजावर आम्ही निवडणुका लढवल्या आहे. घड्याळ्यावर लढलो. काही फरक पडला नाही. कुणी सांगत असेल चिन्ह आम्ही घेऊन जाऊ तर चिन्हं जाऊ देणार नाही. चिन्ह जाणार नाही. जोपर्यंत सामान्य माणसाच्या अंतःकरणात पक्षाचा विचार आहे. तोपर्यंत चिंता करण्याचं कारण नाही, अस शरद पवार म्हणाले.
त्यांना माहीत आहे आपलं नाणं चालणार नाही
जो राजकीय विचार मान्य नाही. त्याविरोधात जाऊन निवडणुकीत मतं घेतली. आता त्याच लोकांसोबत जाणं ही त्या मतदारांशी प्रतारणा आहे. ज्या विचारधारेला विरोध केला त्याच्यांसोबत जाणं योग्य नाही, असं ते म्हणाले. अजित पवार गटाच्या बॅनरवर माझा फोटो होता. त्यांना माहीत आहे आपलं नाणं चालणार नाही. (Mumbai news) त्यामुळे माझा फोटो वापरला. काही लोकांनी भाषणं केली. मला गुरु म्हणाले. पांडुरंग… बडवे… कसले बडवे? कसले काय? पांडुरंगाच्या दर्शनाला कुणाला कोणीही थांबवू शकत नाही. त्यासाठी पंढरपूरलाच जायची गरज नाही. पंढरपूरला गेल्यावर बाहेरून दर्शन घेतात आणि आनंदात जातात. पांडुरंग म्हणायचं गुरू म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष झालं असं सांगायचं. गंमतीची गोष्ट आहे, असंही ते म्हणाले.
छगन भुजबळ यांचे नाव न घेता शरद पवार यांनी जोरदार टीका केली. एक नेते सहा महिने तुरुंगात होते. आम्ही त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केला. ते तुरुंगातून आल्यावर अनेकांनी म्हटलं त्यांना संधी देऊ नका. (Mumbai news) मी म्हटलं त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. त्यांना तिकीट दिलं अन् मंत्री केलं. दोन दिवसांपूर्वी फोन आला. सकाळी म्हणाले, काय चाललंय बघतो. बघून येतो म्हणून गेले अन् मंत्रीपदाची शपथ घेतली, असंही शरद पवार यांनी सांगितलं.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : आमच्यावर टीका करा; पण बापाचा नाद करायचा नाय… सुप्रिया सुळेंचा सज्जड दम!