Mumbai News : मुंबई : प्रत्येकाचा एक काळ असतो. आता काळ तरुणाईचा, पुढील पिढीचा आहे. त्यांच्या हातात सत्तेची, पक्षाची सूत्रं द्यावी. काळानुसार, राजकारण बदलवता आले पाहिजे. काळासोबत धावता आलं पाहिजे. आलेल्या संधीचं सोनं करता आले पाहिजे, अशा अनेक मुद्यांतून राष्ट्रवादीचा सुकाणू कोणाच्या हाती असेल हे अजित पवार यांनी आजच्या भाषणातून स्पष्ट केले. अप्रत्यक्षपणे नवीन नेतृत्वाला संधी देण्याची साद त्यांनी घातली.
नवीन नेतृत्वाला संधी देण्याची साद
शरद पवारांनी राजीनामा दिला. मग तो मागे घेतला. राजीनामा द्यायचाच असेल, तर मागे का घेतला. राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती केली. (Mumbai News ) या सर्व प्रकरणांवरून बंडखोरी केलेल्या अजित पवारांनी हल्लाबोल केला आहे. “राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला?” असा थेट सवालच त्यांनी भर कार्यक्रमात विचारला आहे. त्यामुळे त्यांच्या मनात एवढे दिवस असलेली खदखद आज बाहेर पडली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
कालाय तस्मै नमः असे म्हणतात. काळानुसार बदल होतात. हे बदल स्वीकारावे लागतात. हाच धागा पकडून अजित पवार यांनी राज्यातील राजकारणाचा पट उलगडून दाखवला. (Mumbai News ) भाषणाच्या सुरुवातीलाच अजित पवार यांनी सर्वांच्या मनात सलत असलेला प्रश्न ऐरणीवर घेतला. सध्या राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. ही वेळ राष्ट्रवादीवर का आली या प्रश्नालाच त्यांनी स्पर्श केला.
भाषणाच्या सुरुवातीलाच शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दचा आढावा घेतला. राजकीय जीवनात काम करत असताना साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी तयार झालो आहे, याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. साहेब श्रद्धास्थान आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या. देश पातळीवर आणि राज्य पातळीवर राजकारण सुरू आहे. (Mumbai News ) एखादा पक्ष कशासाठी स्थापन करत असतो. लोकांच्या विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी. संविधानाचा आदर करण्यासाठी. सर्व समाज असेल त्यांच्या विकासासाठी आपण काम करत असतो. सर्व लोकांनी गुण्यागोविंदाने नांदावं. हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार करायचं असतं त्यासाठी आपण काम करत असतो, असे सांगत त्यांनी वेगळी चूल मांडण्यामागची भूमिकाच त्यांनी जाहीर केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : दादांनी आजवर किती अपमान सहन केले, पण सावलीलाही…. धनंजय मुंडे भावूक! म्हणाले,
Mumbai News : पवार साहेब, पक्षातील बडव्यांना दूर करा आणि आम्हाला आशीर्वाद द्या; छगन भुजबळांची साद!