Uddhav Thackeray राजापूर, (रत्नागिरी) : रत्नीगिरीतील ( Ratnigiri) नी बारसू प्रकल्पावरुन ( Nee Barsu project) चांगलेच राजकारण तापले आहे. या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी (local citizens) विरोध केला आहे. त्याला सरकारकडून (government) दडपशाही केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकल्पाला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Thackeray group) यांनी देखील विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर उध्दाव ठाकरे यांनी सोलगावमधील (citizens of Solgao) नागरिकांशी संवाद साधला. (Uddhav Thackeray)
ठाकरेंनी साधला नागरिकांशी संवाद..!
स्थानिक नागरिकांशी संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरे सोलगावमध्ये दाखल होताच नागरिकांनी बारसू प्रकल्प रद्द करा अशी जोरदार घोषणाबाजी केली. उद्धव ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधतानाच बारसूवरून शिंदे , फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला.
स्थानिकांचा विरोध असेल तर प्रकल्प नको, हुकूमशाही पद्धतीनं प्रकल्प लादू नका अन्यथा महाराष्ट्र पेटवून टाकू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला आहे. स्थानिकांचा विरोध असेल तर प्रकल्प नको, हुकूमशाही पद्धतीनं प्रकल्प लादू नका. मी येथं जन की बात ऐकण्यासाठी आलो आहे. मुडदे पाडून विकास होऊ देणार नाही.
दरम्यान, रिफायनरीबाबत दिशाभूल सुरू आहे. कोकणातील जनता विकासविरोधी नाही. मात्र जर हुकूमशाही पद्धतीनं प्रकल्प लादणार असाल तर महाराष्ट्र पेटवून टाकू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी सरकारला दिला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचे बारसूच्या आंदोलकांनी केले स्वागत
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना धक्का ! पुण्यातील माजी नगरसेवकाचा भाजपमध्ये प्रवेश