विशाल कदम
लोणी काळभोर : कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीत मागील पाच वर्षाच्या काळात सत्ता असलेल्या कांही लोकांनी विकासाच्या नावाखाली दिशाभूल करून जनतेची फसवणूक केली आहे. कदमवाकवस्ती ग्रामपंचायत शहराच्या जवळ असुनही, मागील पाच वर्षाच्या काळात हवा तसा विकास होऊ शकलेला नाही. आपल्या गावाच्या सर्वांगीण विकास व्हावा. यासाठीच जनसेवा पॅनेलच्या माध्यमातुन कल्पना काळभोर व त्यांचे सहकारी निवडणुकीच्या रिगणांत उतरले आहेत. मतदारांनीही विकासाच्या मुद्द्यावर जनसेवा पॅनेलच्या कल्पना काळभोर व त्यांच्या सहकाऱ्यांना जनतेने भऱघोष निवडून द्यावे. असे आवाहन पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेसचे उपाध्यक्ष व कदमवाकवस्तीचे माजी सरपंच नंदू काळभोर यांनी केले आहे.
कदमवाकवस्ती ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळीला सुरुवात झाली असून, आज रविवारी (ता.११) जनसेवा पॅनलची संघर्ष यात्रा लोणी स्टेशन येथील चौकातून पाच वाजण्याच्या सुमारास सुरु झाली. यावेळी लोणी स्टेशन परीसरात झालेल्या कोपरा सभेत बोलताना माजी नंदू काळभोर यांनी वरील आवाहन केले.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते प्रवीण काळभोर, विद्यमान उपसरपंच बाबासाहेब काळभोर, साधना सहकारी बॅंकेचे संचालक सुभाष काळभोर, अरुण काळभोर, सुभाष कदम, बाबासाहेब काळभोर, सुनील नाना कदम, बाळासाहेब कदम, ऋषिकेश काळभोर, प्रितम काळभोर, राजेश काळभोर, निलेश काळभोर, सचिन काळभोर, पांडा काळभोर, बाळासाहेब गायकवाड, शरीफमामु खान, विशाल गुजर, सुरेश गायकवाड, राजाराम दळवी, योगेश घुले, विजय थोरात, देविदास कदम, शेखर काळभोर, सुरेश चांदणे, जयसिंग घाडगे, रेखा दाभाडे, नेहा चव्हाण दिलीप दोडके, सुशील काळभोर, अश्वित काळभोर, विलास कदम, प्रदीप गुजर, जयशिंग चंद, दादा चिंतामण घाडगे, पांडुरंग कदम, संजय चांदणे, नितीन टिळेकर आदी उपस्थित होते.
कदमवाकवस्तीचे “सरपंच” पद यंदा “इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव” असुन, मागील पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणे यंदाही सरपंच हा थेट जनतेतुन निवडला जाणार आहे. जनसेवा पॅनेलच्या वतीने “सरपंच” पदासाठी कल्पना काळभोर या रिगणात उतरल्या आहेत. त्यांचा सामना नवपरीवर्तण पॅनेलचे उमेदवार चित्तरंजन गायकवाड यांच्याशी होणार आहे.
दरम्यान, लोणी स्टेशन परीसरात झालेल्या कोपरा सभेत बोलताना सरपंचपदाच्या उमेदवार कल्पना काळभोर म्हणाल्या, कदमवाकवस्तीच्या सर्वागीण विकासासाठी आपल्या घरातील, कुटुबांतील एक महिला उमेदवार म्हणुन मी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. मतदारांनी संधी दिल्यास,कदमवाकवस्ती ग्रामपंचायत ही जिल्हात विकासाचे एक मॉडेल म्हणुन ओळख होईल. असे काम करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे
१) अर्जाची छाननी- सोमवार (५ डिसेंबर)
२) अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत – बुधवार (७ डिसेंबर) दुपारी तीन वाजेपर्यंत)
३) चिन्ह वाटप – बुधवारी दुपारी तीनच्या नंतर.
४)मतदान – रविवार (ता.१८ डिसेंबर, सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०)
५)मतमोजणी – मंगळवार (ता.२० डिसेंबर)