पुणे : महाराष्ट्र विधानपरिषदेचे आगामी पावसाळी अधिवेशन सोमवार, दिनांक १८ जुलै, २०२२ पासून विधान भवन, मुंबई येथे अभिनिमंत्रित करण्यात येणार असल्याबाबतची घोषणा सन २०२२ च्या प्रथम सत्राच्या शेवटच्या दिवशी सत्र संस्थगित करताना करण्यात आली होती..
तथापि, संसदीय कार्य विभागाने कळविल्यानुसार सद्य:स्थितीत सदरहू अधिवेशन पुढे ढकलण्यात आले असून सदर अधिवेशनाची पुढील तारीख संसदीय कार्य विभागाने कळविल्यानंतर यथावकाश कळविण्यात येणार आहे असे विधिमंडळ सचिवलयाने कळवले आहे.