दिनेश सोनवणे
दौंड : बोरीबेल (ता.दौंड) येथील राजू उर्फ खाजाभाई शेख यांची आरपीआय अल्पसंख्यांक आघाडीची प्रदेश सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली लोणावळा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) गटाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी आठवले यांच्या हस्ते राजू उर्फ खाजाभाई शेख यांना निवडीचे पत्र नुकतेच देण्यात आले आहे. यावेळी फैयाज सनदी,शेखलाल नदाफ, आप्पालाल नदाफ उपस्थित होते.
राजू उर्फ खाजाभाई शेख यांनी आरपीआय अल्पसंख्यांक आघाडीची प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वी पार पडली आहे. शेख यांनी या पदाच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांच्या समस्या सोडवून योग्य न्याय देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन वरिष्ठांनी त्यांना प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी दिली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने दिलेली जबाबदारी पार पडणार आहे. या पदाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजातील प्रश्न सोडवणे, शासकीय योजनांची माहिती पोहचवणे आणि पक्षाची विचार धारा सर्व स्तरात पोहचविण्याचे काम करणार आहे. असे नवनियुक्त सरचिटणीस खाजाभाई शेख यांनी सांगितले आहे.