मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. त्यामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढलेला आहे. परंतु आता महाविकास आघाडी मध्ये बिघाडी होते कि काय असे चित्र सद्या दिसत आहे. त्याला कारण ठरले ते म्हणजे शरद पवार याचं विधान. महाविकास आघाडीत जास्त यश मिळालं, ते शरद पवार यांना.
त्यावरून शरद पवार आक्रमक झालेले दिसून येत आहे. महाविकास आघाडीत आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे. आम्ही जास्त जागा लढवयला हव्या होत्या, परंतु महाविकास आघाडीत बिघाड होऊ नये, म्हणून दोन पावले मागे आलो, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यांना आता शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले की, शरद पवार यांचा स्ट्राईक जास्त हे खरे आहे. पण सांगलीच्या जागी काँग्रेसने काम केले नाही. तसेच या जागेवर राष्ट्रवादीने सुद्धा काम केले नाही. दुसरीकडे केंद्र सरकारने सगळ्यात जास्त आम्हाला टार्गेट केले. त्याचा फटका शिवसेनेच्या उमेदवारांना बसला, असे संजय राऊत यांनी म्हटले. शरद पवार विधान सभेसाठी जास्त जागा म्हणजे किती घेतील? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सीएम यांच्यावर हल्लाबोल
संजय राऊत यांनी शरद पवार यांच्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निष्ण साधला आहे. ते म्हणाले, एकनाथ शिंदे म्हणतात, त्यांचा स्ट्राईक रेट चांगला आहे. परंतु त्यांचा बेईमानीचा स्ट्राईक रेट चांगला आहे. त्यांचा थैल्या आणि खोकेचा स्ट्राईक रेट जास्त आहे. त्यांनी पैशाने स्ट्राईक रेट घेतला आहे. त्यांनी मुंबईची जागा लुटली. तसेच ते म्हणाले कि , महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा अजून सुरू झाली नाही. त्यासंदर्भात बैठक ठरलेली होती. परंतु काँग्रेसची दिल्लीत बैठक आहे. यामुळे बैठकीसाठी पुढली तारीख ठरवू.
डमी उमेदवार पद्धत बंद करा
डमी उमेदवार ही पद्धत बंद व्हायला पाहिजे. यातून लोकांना भ्रमित केले जाते आणि मते घेतली जातात. यातून काही तरी मार्ग काढावा लागेल. संदीप गुळवे यांना मत द्यायचे तर डुप्लिकेटला दिले जाते. आदिवासी आणि शेतकरी वर्ग चुकतो. लोकसभा निवडणुकीत लोकांनी शिवसेना समजून धनुष्यबाणला मत दिली होती. त्यांना उद्धव ठाकरे यांना मत द्यायचे होते, असे संजय राऊत यांनी म्हटले.