Ajit Pavar : मुंबई : अजित पवार यांनी वेगळा घरोबा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोणाचा आहे? यावरून वाद-प्रतिवाद सुरु झाला आहे. शरद पवार आणि अजित पवार दोघेही पक्षावर दावा सांगत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण, असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवार यांना विचारला. त्यावेळी त्यांनी त्या प्रश्नाला रोखठोकपणे उत्तर दिलं. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे तुम्ही विसरलात का? असे उत्तर अजित पवार यांनी दिले. (Ajit Pavar)
पक्षकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हेच आहेत, हे तुम्ही विसरलात का? त्यासंदर्भात काल निर्णय केलेला आहे. काल प्रफुल पटेल साहेब बोलले. मी सुद्धा १९९९ साली पक्षाची स्थापना झाल्यापासून भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कामाला सुरुवात केली. आजपर्यंतच काम महाराष्ट्राने पाहिलं आहे. प्रफुल पटेल यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांची निवड केली आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं. (Ajit Pavar)
सुप्रिया सुळे यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करणार का? असा प्रश्न अजित पवार यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं. आम्ही इथे हकालपट्टी करायला बसलो आहोत का? असा प्रश्न विचारच अजित पवार म्हणाले की, हकालपट्टी करण्यासाठी आमचा पक्ष काढलेला नाही. आम्ही बेरेजचं राजकारण करतो आणि पक्ष वाढवतो. (Ajit Pavar)
आपल्या देशात पक्षाबाबत काही गहन प्रश्न निर्माण झाले तर त्या संदर्भातला अधिकार निवडणूक आयोगाला आहे. निवडणूक आयोग सांगतो, पक्ष कोणाकडे आहे, चिन्ह कोणाकडे आहे. त्यासंदर्भात आपल्याला तिथे कळेल. आम्ही पक्ष सोडलेला नाही.