Big Breaking : मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी रविवारी (ता. २) भाजपसोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पक्षांतर्गत बंडाळीला वेग आला आहे. एकीकडे अजित पवार यांच्यासोबत उपस्थित असलेल्या आणि मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या सर्व नेत्यांवर राष्ट्रवादीने कारवाई सुरू केली आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटानेही कारवाईला सुरुवात केली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटील यांनाच प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याची घोषणा केली आहे.
राष्ट्रवादीमध्ये वेगवान घडामोडी
अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याची मोठी घोषणा केली आहे. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सरकारमध्ये सामील झालो. आज काही संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. काल काही नियुक्त्या केल्या आहेत. मागच्या अधिवेशन राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षाची जबाबदारी दिली होती. (Big Breaking ) सप्टेंबरमध्ये दिल्लीतील अधिवेशनामध्ये कार्याध्यक्ष आणि उपाध्यक्ष होतो. पक्षातील सर्व नियुक्त्या माझ्या सहीने झाल्या होत्या. संघटना निवडणूक न करता जयंत पाटील यांना तात्पुरती प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. आता जयंत पाटील यांना या जबाबदारीतून मुक्त करतो. त्यांच्या जागी सुनिल तटकरे यांना प्रदेश अध्यक्ष करतो, आतापासून सर्व कामे ते पाहतील. जयंत पाटील यांना असे सूचित केले आहे, अशी घोषणाच पटेल यांनी केली.
दरम्यान, संयुक्त पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल म्हणाले की, संघटनेमध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार सुनील तटकरे यांनाच राहतील. निलंबनाची प्रक्रिया एका व्यक्तीकडे नाही. (Big Breaking ) विधानसभा अध्यक्षांकडे आहे. अजित पवार यांना सर्व आमदारांना पक्षाचा विधिमंडळ नेता नियुक्ती केला आहे. अनिल भाईदास पाटील यांना प्रतोद करण्याची माहिती अध्यक्षांकडे दिली आहे, असंही पटेल यांनी सांगितलं.
दरम्यान, शरद पवार यांनी नुकतीच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर बडतर्फीची कारवाई केल्याचे जाहीर केले. त्यानंतर काही वेळातच अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत जयंत पाटील यांनाच पदावरून हटवले… या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादीमध्ये नेमके चाललेय काय, याची चर्चा सुरू झाली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big Breaking : मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या या दोन नेत्यांवर बडतर्फीची कारवाई; शरद पवार संतप्त!
Big Breaking : अजितदादांसोबत मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या नेत्यांना नोटीस; अपात्र ठरण्याची शक्यता?