सुरेश घाडगे
परंडा : परंडा तालुक्यातील भैरवनाथ शुगर या साखर कारखान्याने गत गळीत हंगामातील गाळप केलेल्या ऊसाला २५०० रुपयांचा दर द्यावा, अन्यथा पुढील मोर्चा कारखान्यावर काढू व कारखाना बंद करू. असा इशारा माजी आमदार ज्ञानेश्र्वर पाटील यांनी दिला आहे.
परंडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील उस उत्पादक मोर्चा सभेचे गुरूवारी ( दि. २७ ) आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना माजी आमदार ज्ञानेश्र्वर पाटील यांनी वरील इशारा दिला आहे. यावेळी खासदार ओमराजे निबांळकर ,माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, जिल्हाप्रमुख गौतम लटके आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील म्हणाले कि, सावंतांनी मंत्री पदासाठी शिवसेना पक्षाशी केलीली गद्दारी व ऊस उत्पादकांची केलेली गळचेपी यामुळे जनतेत संताप असून गुलाल आम्हीच लावला आहे, आम्हाला बुकाही लावता येतो असा जोरदार घणाघात केला.
यावेळी बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले कि, सावंतांनी जशी पक्षाशी गद्दारी केली तशी किमान या मतदारसंघातील जनतेशी तरी करू नये . विकास कामे आडवून धरू नयेत . मंजूर झालेले ट्रान्सफार्मर शेतकऱ्यांना देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा .ऊसाला सर्वाधिक दर द्यावा
यावेळी बोलताना शिवसेना (ठाकरे) जिल्हाप्रमुख गौतम लटके म्हणाले कि, भैरवनाथ शुगरने शेजारील कारखान्यापेक्षा जास्त व शेतकऱ्यांच्या कष्टाचा वाढीव दर दिला तरच या कारखान्याला ऊस द्यावा अन्यथा देऊ नये . जास्तीचा व रास्त दर देणाऱ्या कारखान्यालाच ऊस द्यावा.
यावेळी बोलताना शिवसेना (ठाकरे) तालुकाप्रमुख मेघराज पाटील म्हणाले कि, भैरवनाथ शुगर कारखान्यात विज व डिस्लरी चे उत्पादन होत आहे . तरीही गत गाळप हंगामातील उसाला केवळ २ हजार चा दर दिला आहे . दिवाळी पुर्वी वाढीव दर देईल अशी आशा उस उत्पादक शेतकऱ्यांना होती मात्र शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले गेल्याने शेतकऱ्यात तीव्र नाराजी पसरली आहे.
दरम्यान, माजी आ. ज्ञानेश्वर पाटील यांच्या नेतृत्वाखाली खासापुरी चौक येथून मोर्चा काढण्यात आला . मोर्चा राजापूरा गल्ली,आगरकर गल्ली,मंडई पेठ,आठवाडी बाजार, टिपू सुलतान चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गने तहसिल कार्यालयावर काढण्यात आला. खासदार ओमराजे निबांळकर ,माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, जिल्हाप्रमुख गौतम लटके, तालुकाप्रमुख मेघराज पाटील, युवा नेते रणजित पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवारांच्या हस्ते उस दरवाढ मागणीचे निवेदन परंडा तहसिलदार रेणूकादास देवणीकर यांना दिले.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हाप्रमुख गौतम लटके,तालुकाप्रमुख मेघराज पाटील, युवा नेते रणजित पाटील,दिलीप शाळु,जि.प. माजी सदस्य ज्ञानेश्वर गीते, शंकर ईतापे,चेतन बोराडे, हनुमंत कातुरे,माजी नगराध्यक्ष शिवाजी मेहेर,जनार्दन मेहेर,सुभाष शिंदे,शंकर जाधव,ईस्माईल कुरेशी, मैनुद्दीन तुटके,अब्बास मुजावर, मकरंद जोशी,शहरप्रमुख इरफान शेख,संतोष गायकवाड,रेवण ढोरे,अजिनाथ शेळके , रमेश गरड , भाऊसाहेब पाटील , बिरूदेव मोरे,प्रशांत गायकवाड, रईस मुजावर,बप्पा चव्हाण,भाऊ सुर्यवंशी, बुद्धीवान गोडगे,बुद्वीवान लटके, अंकुश डांगे,प्रताप पाटील,दिपक गायकवाड,दिपक भापकर,माणिक शिंदे,उमेश परदेशी,कुणाल जाधव, भालचंद्र पाटील,शिवाजी कासारे, सुरेश डाकवाले,दत्ता मेहेर,रंगणाथ देवकर,रामलीग गायकवाड,रफीक मुजावर,सलीम मुजावर,शाहरुख मुजावर,सलीम मुजावर व ऊस उत्पादक शेतकरी युवक मोठया संख्येने सहभागी झाले होते.