वॉशिंग्टन: नासाची क्रू-10 मोहीम अंतर्गत क्रू-10 चे नवीन सदस्य इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) वर पोहोचले आहेत. सर्वांनी एकमेकांना मिठी मारून हा सुंदर क्षण साजरा केला. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी पृथ्वीवर पोहोचण्याची तयारी सुरु केली आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन्ही अंतराळवीर जून पासून म्हणजेच 9 महिन्यापासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) अडकले होते. नासाच्या क्रू-10 मोहीम अंतर्गत आशा निर्माण झाली असून दोघे अंतराळवीर लवकरच परतणार आहेत. रविवारी रात्री 12:05 क्रू -10 मिशनचे स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूल वाजता (EST) ISS सोबत डॉक केले. NASA ला आवश्यक बॅटरी दुरुस्ती करणे आवश्यक होते. त्यामुळे अनेक महिन्यांच्या विलंबानंतर हि मोहीम राबवण्यात आली आहे.
या मोहिमेत चार नवीन अंतराळवीर, ॲन मॅक्क्लेन आणि निकोल आयर्स (नासा), ताकुया ओनिशी (जपान) आणि किरील पेस्कोव्ह (रशिया) यांचा समावेश आहे. ISS वर एकूण सध्या 11 अंतराळवीर असून लवकरच अमेरिकन अंतराळवीर निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव यांच्यासोबत पृथ्वीवर परततील.
जवळपास 9 महिने अंतराळात राहिल्यानंतर पृथ्वीवर परतण्याची प्रक्रिया सोपी नाही. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना अनेक वैद्यकीय चाचण्या कराव्या लागणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार तयारी सुरु झाली असून लवकरच सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परतणार आहे.