पुणे प्राईम न्यूज: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा गुरुवारी सहावा दिवस होता. इस्रायल आणि हमास दोघेही एकमेकांना सातत्याने एकमेकांवर हल्ला करत आहेत. दरम्यान, इस्रायलच्या हल्ल्याबाबत हमासच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मोठा खुलासा केला आहे. इस्रायलवर हल्ला करण्यासाठी हमास दोन वर्षांपासून आखत योजना होता, असे त्यांनी म्हटले आहे.
एका अरब वृत्तवाहिनीशी संवाद साधताना हमासचे वरिष्ठ अधिकारी अली बरका यांनी सांगितले की, इस्रायलवर ‘ऑपरेशन अल अक्सा फ्लड’ सुरू करण्याची योजना हमासकडून दोन वर्षांपूर्वी तयार करण्यात आली होती. मात्र, हमासच्या काही अधिकाऱ्यांनाच याची माहिती होती. बरका यांनी स्पष्ट केले की, हमासने जाणूनबुजून जगासमोर ‘तर्कसंगत’ प्रतिमा सादर केली होती. या ऑपरेशनमध्ये गाझा आपल्या ताब्यात करण्यावर लक्ष केंद्रित केले होते. गुप्तपणे मोठ्या प्रमाणात हल्ल्याचा कट रचला होता. डेली मेल या वृत्तवाहिनीला बुधवारी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला. त्याशिवाय इराण हा हमासचा प्राथमिक राजकीय आणि आर्थिक समर्थक राहिला आहे, हे देखील त्यांनी अधोरेखित केले.
हमास आपल्या योजनेवर काम करत होता :
हमासचे वरिष्ठ अधिकारी अली बरका मुलाखतीत पुढे म्हणाले की, “अर्थातच आम्ही इस्रायलला असे भासवले की, हमास गाझावर सत्ता चालवण्यात व्यस्त आहे. परंतु, आम्ही आमच्या योजनेवर बराच काळ काम करत होतो. वेळ आल्यावर ती अंमलात आणली गेली.” वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, हमास कमांडर मोहम्मद डेफची मे 2021 मध्ये झालेल्या हल्ल्यात महत्त्वाची भूमिका होती. त्या हल्ल्यात 1200 लोक मारले गेले होते, तर 2700 हून अधिक जखमी झाले होते.
हमासवर बेंजामिन नेतन्याहू यांची नाराजी :
हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर रशियाचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी नाराजी व्यक्त केली. ‘हमासच्या प्रत्येक दहशतवाद्याने आता स्वत:ला मृत समजावे’ हेच ते पुन्हा पुन्हा सांगत होते. नेतन्याहू यांनी आपल्या ताज्या विधानात म्हटले आहे की, “हमास दाएश ( जो पायाखाली चिरडतो किंवा पायदळी तुडवतो ). जगाने ज्याप्रमाणे दाएशचा नाश केला आहे, त्याचप्रमाणे आम्ही हमास संघटनेतील प्रत्येकाला ठेचून काढू.” बीबीसीच्या रिपोर्टनुसार इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यामुळे मृतांची संख्या 1,200 वर पोहोचली आहे. तर, गाझामध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात 1000 हून अधिक लोक मारले गेले आहेत.
त्याशिवाय, आयडीएफने नुकताच बेरी गावातून भयावह व्हिडीओ जारी केला. ज्यात, बेरी हे गाव दुसऱ्या क्रूर हत्याकांडाचे ठिकाण असल्याचे म्हटले आहे. हॉस्पिटल आणि नागरी भागात जास्तीत जास्त नागरिकांची हानी करण्याचे उद्दिष्ट आहे. एकीकडे इस्रायली सैन्याने नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे, तर हमासने काही नागरिकांना वेठीस धरले आहे, ज्यामुळे या प्रदेशातील वाढत्या तणावात भर पडली. त्याशिवाय महिलांवरील अत्याचार, बलात्कार, अशा घटना ही घडल्या आहेत.