Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सामर्थ्यवान माणूसच शांतता प्रस्थापित करू शकतो: नितीन गडकरी, ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचा 6 वा दीक्षांत समारंभ; 2805 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 13 October 2023, 22:31
Nitin Gadkari at MIT ADT University's 6th Convocation on Friday Pune

पुणेः सध्या जगभरात वर्ण आणि जातीभेदावरून आपण अशांतता माजल्याचे पाहतो. परंतु, दुसरीकडे भारत ‘वसुदैव कुटूंबकम’चा जगाला संदेश देत आपल्या विविधततेतील एकतेमुळे भाषा, प्रांत आणि जातीपातीची बंधने तोडून देशात शांतता प्रस्थापित करताना दिसत आहे. त्यामुळे आपल्या देशाची विविधता हे आपले सामर्थ्य आहे. सामर्थ्यवान माणसेच शांतता प्रस्थापित करू शकतात, असे मत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ते तत्वज्ञ संत ज्ञानेश्वर महाराज विश्वशांती डोम, विश्वराजबाग येथे आयोजित एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टॅक्‍नॉलॉजी विद्यापीठ, पुणेच्या सहाव्या दीक्षांत समारंभात बोलत होते.

या प्रसंगी माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्यकारी अध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, एमआयटी डब्लूपीयूचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड, प्रा.डाॅ.सुनिता कराड, ज्योती ढाकणे-कराड, पद्मश्री डाॅ.जी.डी. यादव, डाॅ.विनायक घसनीस, डाॅ.सुचित्रा नागरे, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, परीक्षा नियंत्रक डाॅ.ज्ञानदेव निलवर्ण, डाॅ,विरेंद्र शेटे यादी मान्यवर उपस्थित होते.

गडकरी पुढे म्हणाले, अध्यात्माचा संबंध हा प्रत्येकाच्या जिवनाशी व जीवनातील प्रत्येक गोष्टीशी असतो. आर्थिक प्रगतीसाठी मानवाची सांस्कृतिक प्रगतीही तितकीच महत्वाची असते. असेच मुल्याधिष्ठीत व संस्कृतीची जाण असणारे विद्यार्थी घडविण्याचे काम एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या माध्यमातून घडत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान व संशोधनाच्या माध्यमातूनच आपण गरिबी दूर करू शकतो आणि अशाच प्रकारच्या संशोधनाला प्रोत्साहन देण्याचे काम या विद्यापीठाकडून घडत आहे. नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच विश्वशांती प्राप्त होऊ शकते, ती प्रस्थापित करण्यासाठी प्रा.डाॅ. विश्वनाथ कराड करत असणारे कार्य उल्लेखनीय आहे म्हणत, गडकरींनी एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या पाठीवर कौतुकाची थापही मारली.

आपला शेतकरी आता ऊर्जा दाता बनला आहे. त्यामुळे भविष्यात भारत हा ऊर्जा आयात करणारा नाही, तर निर्यात करणारा देश ठरेल. तसेच सर्व धर्माचा सन्मान करणे सध्या काळाची गरज आहे. त्यातूनच विश्वशांतीसाठीचा प्रयत्न यशस्वी होऊ शकतो. देशाला पुढे घेऊन जायचे असल्यास आपल्या संशोधनाला आणखी आघाडीवर घेऊन जाण्याची आवश्यकता आहे. इस्त्रोने भारताला अंतराळ संशोधनातील एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. इस्त्रो अंतराळ संशोधनात करत असलेले कार्यही देशासाठी प्रेरणादायी आहे, असे गडकरींनी यावेळी म्हटले.

 

या कार्यक्रमाच्या प्रसंगी, एमआयटी एडीटी विद्यापीठातर्फे भारतीय अंतराळ संशोधन संस्था(इस्त्रो), बंगळुरूचे माजी चेअरमन पद्मश्री. डॉ.ए.एस.किरण कुमार यांना विज्ञान व तंत्रज्ञानामधील योगदानाबद्दल भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुरस्काराने गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा.डाॅ.मंगेश कराड म्हणाले की, पदवी प्रदान सोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा क्षण असतो. ज्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याचा शेवट व उज्वल भविष्याची सुरुवात होत असते. अशात यंदाचा सहावा दीक्षांत समारंभ ‘एमआयटी एडीटी’साठी गौरवाचा दिवस आहे. तरी या निमित्ताने सर्व पदवी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन व भावी कारकिर्तीसाठी शुभेच्छा देऊ इच्छितो. ‘एमआयटी एडीटी’ने ने परीक्षेसाठी संपूर्ण डिजीटल प्रणाली अवलंबली असून त्यामुळे निर्विघ्न परिक्षेची अंमलबजावणी, वेळेत अचूकी निकाल व सर्व प्रक्रियेतील पारदर्शकता ही ‘एमआयटी एडीटी’ची आता खासियत बनली आहे.

याप्रसंगी बोलताना पद्मश्री डाॅ.किरण कुमार म्हणाले, देशातील शैक्षणिक क्षेत्रात मोठा बदल घडवित असणाऱ्या एमआयटी एडीटी विद्यापीठाद्वारे डाॅ.कलाम यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार स्विकारणे माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. आपण कुठल्याही क्षेत्रात कमी नाही, हे भारताने नुकतेच जगाला दाखवून दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृतीचा अभिमान आणि स्वाभिमान बाळगूण देशाचे नाव वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. आपल्या देशात जगात कोणाकडेही नाही, अशी प्रतिभावंत युवा पिढी आहे. या युवा पिढीच्या खांद्यावर आता डाॅ.कलाम यांनी दाखवलेल्या प्रगत देशाचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

‘पैसे दे कारवाई थांबवतो’ पुण्यात अनधिकृत पानटपरीवर कारवाई टाळण्यासाठी चक्क ३०० रुपयांची लाच घेणारा पोलीस कॉन्स्टेबल निलंबि

Thursday, 3 September 2026, 17:21

लोणी काळभोरच्या एमआयटी स्कूलमध्ये हुकुमशाही कारभाराचा आरोप! अवघा एक मिनिट उशीर अन् 125 ते 150 विद्यार्थ्यांना तासनतास ताटकळत उभं केल्याचा पालकांचा आरोप..

Thursday, 3 September 2026, 17:07

“पोलीस संरक्षण द्या, नाहीतर…!”पुण्यातील मारहाणीनंतर बापट कुटुंबीयांची सुरक्षा वाढवण्याची मागणी

Thursday, 3 September 2026, 16:44

पुण्यात भाईगिरी करण्यासाठी पिस्तूल हातात घेतलं, अचानक गोळी सुटली अन् थेट मित्राच्या मांडीत घुसली; नेमकं काय घडलं?

Thursday, 3 September 2026, 16:37

पुणेकरांच्या खिशाला कात्री! रिक्षाने प्रवास करणे होणार आता आणखी महाग; आरटीओच्या नवीन भाडेवाढीला प्रत्यक्षात सुरुवात

Thursday, 3 September 2026, 16:06

बाप रे, एवढं सोनं! तिरुपती बालाजी मंदिराच्या बड्या अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड! पहा धक्कादायक व्हायरल Video

Thursday, 3 September 2026, 15:52
Next Post

Hadapsar News : ससानेनगर येथील अट्टल गुन्हेगार २ वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार ; हडपसर पोलिसांची कामगिरी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp