पुरी: लोकसभा निवडणूक-2024 साठी आतापर्यंत फक्त दोन टप्पे मतदान झाले आहे, परंतु सर्वात मोठा विरोधी पक्ष काँग्रेसला सातत्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. सूरत आणि इंदूरनंतर आता ओडिशाचे हॉट सीट समजल्या जाणाऱ्या पुरीमधून काँग्रेसच्या उमेदवाराने निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. पुरी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने सुचरिता मोहंती यांना तिकीट दिले होते. सुचरिता यांनी तिकीट परत करून उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. भाजपचे दिग्गज नेते संबित पात्रा हेही या जागेवरून नशीब आजमावत आहेत. सुचरिताने नाव मागे घेतल्याने संबित पात्रा यांचा मार्ग सुकर होऊ शकतो.
सूरत आणि इंदूरनंतर ओडिशाचे हॉट सीट असलेल्या पुरीमध्येही काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. निधीअभावी ओडिशाच्या पुरी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार सुचरिता मोहंती यांनी मतदानापूर्वीच मैदान सोडले आहे. त्यांनी काँग्रेसला तिकीट परत केले आहे. यापूर्वी गुजरातमधील सुरत आणि मध्य प्रदेशातील इंदूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराने आपले नाव मागे घेत निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. सुरतमध्ये तर भाजपच्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आले.
सुचरिता मोहंती यांनी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांना पत्र लिहून या संदर्भात त्यांच्या निर्णयाची माहिती दिली आहे. लोकसभा निवडणुकीचे उमेदवारी तिकीट परत करताना पुरी येथील काँग्रेसच्या उमेदवार सुचरिता मोहंती यांनी संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, त्यांना पक्षाने निवडणूक लढवण्यासाठी दिलेली रक्कम देण्यात आलेली नाही. पैशाअभावी त्या प्रचार करू शकत नाही. पुरी लोकसभा जागेसाठी 25 मे रोजी मतदान होणार आहे, त्याआधीच काँग्रेसला हा धक्का बसला आहे.
ओडिशातील पुरी लोकसभा मतदारसंघातून संबित पात्रा हे भाजपचे उमेदवार आहेत. काँग्रेसच्या उमेदवार सुचरिता मोहंती यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर पात्रा यांचा मार्ग सुकर होऊ शकतो. याआधी सुरत आणि इंदूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांनी शेवटच्या क्षणी आपली नावे मागे घेतली होती. सुरतमध्येही भाजपचा उमेदवार विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले आहे.