नवी दिल्ली: एनसीईआरटीनं एक मोठा निर्णय घेतला आहे. आता एनसीईआरटीच्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये इंडिया या शब्दाऐवजी भारत हा शब्द वापरण्यात येणार आहे. यापुढे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (National Council of Educational Research and Training) म्हणजेच एनसीईआरटीच्या पुस्तकात इंडिया हा शब्द दिसणार नाही. या शब्दाच्या ऐवजी भारत हा शब्द पुस्तकात असणार आहे. ‘भारत’ शब्दाच्या उल्लेखाच्या प्रस्तावाला एनसीईआरटीने मंजुरी दिली आहे.
एनसीईआरटीने पुस्तक निर्मितीसाठी एकोणीस सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. एनसीईआरटीच्या पुस्तकात इंडिया या शब्दाच्या ऐवजी भारत हा शब्द वापरण्यात यावा, या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. आता एनसीईआरटी पुस्तके छापली जातील, तेव्हा त्या पुस्तकांमध्ये इंडिया या शब्दाच्या ऐवजी भारत हा शब्द वापरण्यात येणार आहेत. तसेच प्राचीन इतिहास या शब्दाच्या ऐवजी शास्त्रीय इतिहास हा शब्द देखील वापरण्यात येणार आहे. आता एनसीईआरटीच्या या निर्णयानंतर भारतातील इतर शैक्षणिक बोर्ड देखील हा निर्णय घेतील का? हे आता पाहणे महत्वाचे आहे.
एनसीईआरटी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने शालेय पाठ्यपुस्तकांच्या अभ्यासक्रमात सुधारणा करत आहे. अशातच आता एनसीईआरटीने त्यांच्या पुस्तकांमधील काही शब्द बदलण्याचा निर्णय घेतला आहे.