Japan Earthquake : नवी दिल्ली : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी उत्तर मध्य जपानमध्ये7.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. जपान मेट्रोलॉजिकल एजन्सीने इशिकावा आणि जवळपासच्या प्रांतांमध्ये भूकंप झाल्याची माहिती दिली, त्यापैकी एकाची प्राथमिक तीव्रता 7.4 इतकी होती.
भूकंप होण्याआधी जपानच्या हवामान संस्थेने इशिकावा, निगाता आणि तोयामा प्रीफेक्चर्सच्या किनारपट्टीवर त्सुनामीचा इशारा दिला होता. त्यानंतर पश्चिम भागात जोरदार भूकंपाचे धक्के बसले, असा दावा करण्यात आला आहे.
WATCH: Tsunami waves observed along the coast of western Japan. People being urged to evacuate pic.twitter.com/sY3bdpVZVc
— BNO News (@BNONews) January 1, 2024
भूकंपामुळे 5 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा इशिकावा प्रीफेक्चरमधील वाजिमा सिटीच्या किनारपट्टीवर आदळल्या. “सर्व रहिवाशांनी ताबडतोब उंच जमिनीवर जाणे आवश्यक आहे,”असे जपानच्या वतृवाहिन्यांकडून सांगितले जात आहे. जपानमधील 7.6 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर पूर्व किनारपट्टीच्या काही भागांमध्ये समुद्राची पातळी वाढू शकते, असे दक्षिण कोरियाच्या हवामान संस्थेने म्हटले आहे. 11 मार्च 2011 रोजी ईशान्य जपानला मोठा भूकंप आणि त्सुनामी आली, शहरे उद्ध्वस्त झाली होती.