नवी दिल्ली: काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली आहे . बुधवारी उशिरा आलेल्या या यादीत एकूण 14 नावांचा समावेश आहे. हे उमेदवार एकूण चार राज्यांतील आहेत, ज्यामध्ये झारखंड, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशच्या जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
मध्य प्रदेशातील गुना मतदारसंघातून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या विरोधात राव यादवेंद्र सिंह यांना संधी देण्यात आली आहे, तर काँग्रेसने मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या विरोधात विदिशामधून प्रताप भानू शर्मा यांना उमेदवारी दिली आहे.
कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge की अध्यक्षता में आयोजित ‘केंद्रीय चुनाव समिति’ की बैठक में लोकसभा चुनाव, 2024 के लिए कांग्रेस उम्मीदवारों के नाम की आठवीं लिस्ट। pic.twitter.com/gaX0tHHxUO
— Congress (@INCIndia) March 27, 2024
याच्या एक दिवस आधी म्हणजेच 26 मार्च 2024 रोजी काँग्रेसच्या ‘केंद्रीय निवडणूक समिती’ (CEC) बैठकीत सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची सातवी यादी जाहीर केली होती, ज्यामध्ये पाच नावे होती. चार नावे छत्तीसगडमधील, तर एक नाव तामिळनाडूचे होते. छत्तीसगडच्या सुरगुजा (एसटी)मधून शशी सिंह, रायगड (एसटी)मधून डॉ. मै देवी सिंह, बिलासपूरमधून देवेंद्र सिंह यादव आणि कांकेर (एसटी)मधून बिरेश ठाकूर यांना संधी देण्यात आली आहे. तर मायलादुथुराई मतदारसंघातून आर सुधा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसने यापूर्वी यूपीमधून नऊ उमेदवारांची घोषणा केली होती, ज्या अंतर्गत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजय राय पुन्हा पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक लढवतील. त्यांना चौथ्या यादीत वाराणसीतून तिकीट देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे, तर 4 जून 2024 रोजी निकाल जाहीर होणार आहेत.