नवी दिल्ली: राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान २ फेब्रुवारी ते ३० मार्च २०२५ या कालावधीत जनतेसाठी खुले राहणार आहे. उद्यानाच्या देखभालीचा सोमवार हा वार वगळता, आठवड्यातील इतर वारी सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत लोक उद्यानाला भेट देऊ शकतात. उद्यान ५ , २०, २१ फेब्रुवारी आणि १४ मार्च रोजी बंद राहील.
भेट देणाऱ्या सर्वांसाठी प्रवेश आणि निर्गमन प्रेसीडेंट्स इस्टेटच्या प्रवेशद्वार क्रमांक ३५ मधून होईल, जे नॉर्थ अॅव्हेन्यूपासून राष्ट्रपती भवनाच्या जवळ आहे. अभ्यागतांच्या सोयीसाठी, सेंट्रल सेक्रेटरिएट मेट्रो स्टेशन ते प्रवेशद्वार, क्रमांक ३५ दरम्यान शटल बससेवा दर ३० मिनिटांनी सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध असेल. अमृत उद्यान २६ मार्च दिव्यांग व्यक्तींसाठी, २७ मार्च- संरक्षण, निमलष्करी आणि पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी, २८ मार्च- महिला आणि आदिवासी महिला स्वयंसहायता गटांसाठी, २९ मार्च- जेष्ठनागरिकांसाठी या दिवशी विशेष श्रेणींसाठी खुले राहील.