Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pradnya Satav joins BJP: राज्यात काँग्रेसला मोठा धक्का..! प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश; विरोधी पक्षनेतेपदाच्या गणितात बदल

Santosh Mundeby Santosh Munde
Friday, 19 December 2025, 17:40

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश (Pradnya Satav joins BJP) केला आहे. त्यांनी काँग्रेसच्या कोट्यातून मिळालेल्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या राजकीय खेळीमुळे एकाच वेळी अनेक समीकरणे बदलल्याचे दिसून येत आहे.

 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने महाराष्ट्रात जिंकलेल्या दोन जागांपैकी एक जागा हिंगोलीची होती, जिथून राजीव सातव विजयी झाले होते.  2021 मध्ये अवघ्या 46 व्या वर्षी त्यांचे निधन झाल्यानंतर काँग्रेसने त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर पाठवले होते. मात्र, गुरुवारी त्यांनी काँग्रेसशी सर्व संबंध तोडत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि ज्येष्ठ मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला.

हेही वाचा: पुण्यातील भयंकर प्रकार! आईच्याच बॉयफ्रेंडकडून मुलगी राहिली गर्भवती; वारंवार बलात्कार अन् जन्मदात्रीनेच केला घात, बाळाला जन्म दिल्यावरही..

प्रज्ञा सातव यांच्या काँग्रेसमधून बाहेर पडल्याने विधान परिषदेत काँग्रेसचे संख्याबळ कमी झाले असून, त्याचबरोबर विरोधी पक्षनेतेपदावरील पक्षाचा दावा देखील कमकुवत झाला आहे. विधान परिषदेत काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रत्येकी सहा सदस्य होते, तर विधानसभेत शिवसेना (ऊबाठा) चे 20 आणि काँग्रेसचे 16 आमदार आहेत.

काँग्रेसची इच्छा विधान परिषदेत सतेज पाटील यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड व्हावी अशी होती, तर विधानसभेत संख्याबळ जास्त असल्याने शिवसेना (ऊबाठा) ला हे पद मिळावे, असा समन्वय होता. मात्र, भाजपच्या या हालचालीमुळे काँग्रेसची रणनीती बिघडली असून, शिवसेना (ऊबाठा) ला काहीसा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा: ‘कांचा’चा उच्छाद! “मी इथला डॉन आहे” म्हणत भररस्त्यात तांडव; चोरीचा जाब विचारणाऱ्यांना स्क्रू-ड्रायव्हरने भोसकलं!

दरम्यान, शिवसेना (ऊबाठा) अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः विधान परिषदेचे सदस्य असल्याने, आता विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदावर त्यांचा थेट दावा निर्माण झाला आहे. दुसरीकडे, विधानसभेत शिवसेना (ऊबाठा) आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेते बनवण्याच्या विचारात होती. मात्र, दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेते एकाच कुटुंबातील असतील, तर उद्धव ठाकरे यांना टीकेला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे विधानसभेतील हे पद दुसऱ्या नेत्याला देण्याची शक्यता वाढली आहे.

या घडामोडींमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय उद्दिष्ट साध्य झाल्याचे मानले जात असून, आदित्य ठाकरे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग अडला आहे. त्याचबरोबर, काँग्रेस दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपदापासून वंचित राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा: दोस्त दोस्त ना रहा! पुण्यात ‘‘तू छपरी आहे, दोस्तीच्या लायकीचा नाही’’ म्हणत मित्राच्याच छातीवर चाकूने सपासप वार

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

भिगवणमध्ये सुसज्ज क्रीडांगणाचा अभाव; तरुणाईचा संताप, उपाययोजनांची मागणी तीव्र

Saturday, 4 April 2026, 18:18
baramati

Baramati : बारामतीत अखेर ‘मैदान’ मारणार कोण? बिनविरोधची चर्चा हवेत विरली; काय म्हणाले जय पवार ?

Saturday, 4 April 2026, 18:08

शिरूर-चौफुला महामार्गावर आंबळेत भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, ट्रकचालक फरार….

Saturday, 4 April 2026, 18:08
"I won't leave you alive today" The husband's head was pounding after seeing his wife's Instagram chat; the ghost of doubt entered his head and he immediately put on a four-wheeler...

“तुला आज जिवंत सोडणार नाही” बायकोची इंस्टाग्राम चॅट पाहून नवऱ्याचं डोकं सटकलं; संशयाचं भूत डोक्यात घुसलं अन् सरळ चारचाकी अंगावर घालत…

Saturday, 4 April 2026, 17:56
Crime

Crime : मदतीसाठी ओरडणारी आई आणि रडणारी मुलगी; मामाच्या मुलानेच नात्याला लावला काळिमा; दुचाकीवर बसवून थेट…

Saturday, 4 April 2026, 17:44

पुणेकर चाहत्यांचा हिरमोड! अवकाळी पावसाचा “यो यो हनी सिंह”च्या शोला फटका; 4 एप्रिलचा कॉन्सर्ट आता “या” तारखेला होणार

Saturday, 4 April 2026, 17:11
Next Post
Breaking news

Breaking News : माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा! १ लाखांच्या जातमुचलक्यावर कोकाटेंची मुक्तता; पण आमदारकीवर धोक्याचे ढग...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.