Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्यातील भयंकर प्रकार! आईच्याच बॉयफ्रेंडकडून मुलगी राहिली गर्भवती; वारंवार बलात्कार अन् जन्मदात्रीनेच केला घात, बाळाला जन्म दिल्यावरही..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 19 December 2025, 17:15
Pune Crime: Horrific incident in Pune! Girl gets pregnant by mother's boyfriend; repeatedly raped and murdered by the mother herself, even after giving birth to the baby..

पुणे: पुणे येथील काळेपडळ (Pune Crime) परिसरातून एक अतिशय (Pune News) धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिच्या आईच्याच प्रियकराने लैंगिक अत्याचार केले आणि त्यातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. धक्कादायक बाब म्हणजे या नराधम प्रियकराला वाचवण्यासाठी पीडित मुलीच्या आईनेच आपल्या पोटच्या मुलीचा बनावट जन्म दाखला तयार करून ती सज्ञान असल्याचे भासवले. हा सर्व प्रकार तब्बल दीड वर्षानंतर एका निनावी फोनमुळे समोर आला आहे. (Latest Breaking News)

 

एक निनावी फोन आला अन्

मिळालेल्या माहितीनुसार, काळेपडळ पोलिसांनी या प्रकरणी चेतन सूर्यकांत आरणे (वय 25, रा. प्रगतीनगर, हडपसर) आणि पीडित मुलीच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 2023 ते 2024 या कालावधीत घडली होती. काळेपडळ पोलीस ठाण्याला 4 डिसेंबर रोजी पोलीस नियंत्रण कक्षातून एक निनावी फोन आला होता. काळेपडळ भागात एक अल्पवयीन मुलगी आपल्या लहान बाळासह राहत असल्याची माहिती या फोनद्वारे देण्यात आली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असता हा सर्व भयंकर प्रकार उघड झाला. (Marathi News)

वारंवार अत्याचार

आरोपी चेतन आरणे हा पीडित मुलीच्या आईसोबत राहत होता. याच काळात त्याने या 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. या अत्याचारातून ही मुलगी गर्भवती राहिली आणि एप्रिल 2024 मध्ये तिने ससून रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला. यावेळी गुन्हा दाखल होऊ नये म्हणून आरोपी चेतन आणि मुलीच्या आईने कट रचला. त्यांनी नागपूर महानगरपालिकेचा एक बनावट जन्म दाखला तयार केला, ज्यामध्ये मुलीचे वय अधिक दाखवण्यात आले होते. हा खोटा दाखला त्यांनी ससून रुग्णालयातील डॉक्टरांना दाखवून मुलगी सज्ञान असल्याचे भासवले आणि पोलिसांची दिशाभूल केली.

बनावट जन्मदाखला

पोलिसांनी जेव्हा या जन्म दाखल्याची सखोल चौकशी केली, तेव्हा तो बनावट असल्याचे स्पष्ट झाले. मुलीच्या आईनेच प्रियकराला कायदेशीर कारवाईपासून वाचवण्यासाठी आपल्या अल्पवयीन मुलीचे आयुष्य धोक्यात टाकले आणि सरकारी यंत्रणेची फसवणूक केली. या गंभीर प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सध्या काळेपडळ पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका निनावी फोनमुळे या चिमुकल्या मुलीवर झालेला अन्याय जगासमोर आला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47
Next Post
beed crime

Crime News : विवाहितेला हॉटेलमध्ये जबरदस्तीने काम करून घेत कोंडून ठेवलं; पतीसह ६ जणांनी जगणे केले मुश्किल, बाळ होऊ नये म्हणून...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.