Friday, May 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भिगवणमध्ये सुसज्ज क्रीडांगणाचा अभाव; तरुणाईचा संताप, उपाययोजनांची मागणी तीव्र

सागर जगदाळेby सागर जगदाळे
Saturday, 4 April 2026, 18:18

भिगवण: सुमारे पंचवीस हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या भिगवणसारख्या वाढत्या गावात आजही सुसज्ज क्रीडांगणाचा अभाव असल्याने तरुणाईसमोर मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. गावाच्या विकासाच्या दृष्टीने विविध कामे होत असताना क्रीडा सुविधांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर येत आहे.

सध्या गावात उपलब्ध असलेले क्रीडांगण अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असून, जागाही अपुरी पडत आहे. त्यामुळे खेळाडूंना नियमित सरावासाठी आवश्यक सुविधा मिळत नाहीत. काही वर्षांपूर्वी भिगवणमध्ये मोठ्या प्रमाणावर क्रिकेट स्पर्धा भरविल्या जात होत्या. यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, इंदापूरच्या उपबाजारातील जागेचा वापर केला जात होता. मात्र बाजार समितीच्या विस्तारामुळे ही जागा खेळांसाठी उपलब्ध राहिलेली नाही.

 

क्रीडांगण हे केवळ खेळाचे ठिकाण नसून, ते तरुणांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र असते. खेळामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात. मात्र मैदानाच्या अभावामुळे भिगवणमधील अनेक होतकरू खेळाडू संधीपासून वंचित राहत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. परिणामी, तरुणाई मैदानी खेळांपासून दूर जाऊन मोबाईल व आभासी जगात गुंतत असल्याचेही वास्तव समोर येत आहे.

दरम्यान, भिगवणसाठी भव्य क्रीडांगण उभारण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. भिगवण हे पुनर्वसित गाव असल्यामुळे गायरान जागेचा अभाव आहे. त्यामुळे वनखात्याची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी पुढे येत आहे. स्थानिक पातळीवर तसेच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या प्रश्नाला गती देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

एकूणच, भिगवणच्या विकासाच्या दृष्टीने सुसज्ज क्रीडांगण ही अत्यावश्यक गरज बनली असून, यावर तातडीने निर्णय होणे आवश्यक आहे. अन्यथा गावातील तरुणाईच्या क्रीडा स्वप्नांना मर्यादा येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

“भिगवण गावासाठी भव्य क्रीडांगण उभारणे ही काळाची गरज आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे लवकरच जागेची मागणी करण्यात येणार आहे.
भिगवण हे पुनर्वसित गाव असल्यामुळे गायरान जागा उपलब्ध नाही. त्यामुळे वन विभागाची (फॉरेस्ट) जागा मिळाल्यास तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात सुसज्ज क्रीडांगण उभारणे शक्य होईल.”
— पराग जाधव
माजी सरपंच, भिगवण

“भिगवणच्या क्रीडांगणाचा विषय अत्यंत महत्त्वाचा असून, यावर आम्ही सातत्याने चर्चा करत आहोत. वार्ड क्रमांक ४ मधील सध्याच्या जागेवरील अतिक्रमणाचा प्रश्न ग्रामपंचायतीमार्फत मोजणी करून मार्गी लावण्याचा प्रयत्न करू.
तसेच नवीन गायरान किंवा वनखात्याची जागा मिळवण्यासाठी दत्तात्रय भरणे, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून शासकीय पाठपुरावा करून सुमारे ५ ते ६ एकर जागा क्रीडांगणासाठी मिळविण्याचा प्रयत्न करू.”
— सचिन बोगावत
सामाजिक कार्यकर्ते, भिगवण

 

 

 

 

सागर जगदाळे

सागर जगदाळे

अडीज वर्ष दैनिक पुण्यनगरी काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये भिगवण येथील प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या लिहिण्याचा खूप मोठा अनुभव आहे.

ताज्या बातम्या

RTE News : आरटीई प्रवेश घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश; पुणे जिल्ह्यात विशेष समिती नियुक्त, दहा दिवसांत अहवाल सादर करणार

Friday, 15 May 2026, 19:23

Hadapsar Bomb Case : हॉस्पिटलमधील बॉम्बमध्ये नव्हती कोणतीही स्फोटके ; हॉस्पिटलने उपचाराचे मोठे बिल आकारण्यात आल्याच्या रागातून रचला कट, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची माहिती..

Friday, 15 May 2026, 19:19

BIG BREAKING NEWS : “हा बोत्रे कोण आहे?”; शरद पवारांच्या एका प्रश्नाने साखर उद्योगात खळबळ

Friday, 15 May 2026, 17:47

Mawal Land Scam : मावळात कोट्यवधींच्या जमिनीचा महास्कॅम?; बनावट सरकारी आदेश तयार करून ‘भोगवटादार वर्ग-२’ची जमीनी विकल्या, ६ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 17:20

Mumbai News: “BMCतील वादग्रस्त अधिकाऱ्याचा आणखी एक कारनामा? अभिनेता जावेद जाफरी यांच्या पत्नीची 16 कोटींची फसवणूक; महेश पाटील पुन्हा वादाच्या भोवऱ्यात”

Friday, 15 May 2026, 17:12

Hadapsar Bomb Case : “युट्युबवर पाहून बनवला बॉम्बसदृश (IED) ; उपचारासाठी पैशांची गरज, हॉस्पिटलला खंडणीची धमकी देण्याचा कट उघड, पुणे पोलीस आयुक्तांनी केला मोठा खुलासा..”

Friday, 15 May 2026, 16:44
Next Post
Shocking incident in Pimpri! Man abuses minor girl twice; Called girl home, threatened her and....

पिंपरीतील धक्कादायक प्रकार! नराधमाचा चिमुकलीवर दोनदा अत्याचार; मुलीला घरी बोलावलं, धमकी दिली अन्....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.