Mumbai News : मुंबई : ड्रग्स रॅकेटचा सूत्रधार ललित पाटील याला तब्बल १५ दिवसांनंतर मुंबईच्या साकीनाका पोलिसांच्या पथकाने बंगळुरूमधून अटक केली आहे. बुधवारी (ता. १८) त्याला अंधेरी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पुढील पाच दिवस तो साकीनाका पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे. या वेळी केलेल्या चौकशीदरम्यान, पुणे पोलिसांकडून आपल्या जिवाला धोका असल्याचा धक्कादायक खुलासा ललित पाटीलने केला आहे.
ड्रग्स प्रकरणात ललित पाटीलचा मोठा रोल
आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाकडे ललित पाटीलला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याची विनंती केली. परंतु, सरकारी वकिलांनी सांगितले की, हे ड्रग्स रॅकेट मोठे आहे. पोलिसांनी बाराव्या आरोपीला अटक केली त्यावेळी तो कच्चा माल ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटीलला पुरवायचा आणि त्यानंतर ललित तो घेत होता. असे त्याने कबूल केले आहे. (Mumbai News) हे संपूर्ण ड्रग्स रॅकेट ससून हॉस्पिटलमधून चालवले जात होते. यामुळे याप्रकरणी न्यायाधीशांनी सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, ललित पाटील याची रिमांड मिळावी, अशी मागणी साकीनाका पोलिसांनी कोर्टासमोर केली. नाशिक कारखान्यावर झालेल्या ड्रग्स कारवाईमध्ये ड्रग्स तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल पुरवण्यासाठी जो आरोपी मदत करत होता, (Mumbai News) त्याने ललित पाटीलचे नाव चौकशी दरम्यान घेतले आहे.
ड्रग्स प्रकरणात ललित पाटीलचा मोठा रोल आहे, हे यामुळे उघड झाले आहे. मुंबई, पुणे, नाशिक पोलिसांत त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. (Mumbai News) या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी मुंबई पोलिसांना करायची असल्याचे सरकारी वकीलांनी न्यायालयात सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : शेअर बाजाराकडे गुंतवणूकदारांचा वाढतोय कल; 26 टक्क्यांनी वाढली डिमॅट खाती