Mumbai News : मुंबई : पुण्याहून दिल्लीला निघालेल्या अक्सा एअरच्या विमानात एक अजब प्रकार घडला. पुणे-दिल्ली विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशानं असं काय केलं त्यामुळे मुंबई पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. अक्सा एअरच्या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाने सर्वात आधी छातीत दुखत असल्याचा दावा केला. त्यामुळे विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. मात्र, या प्रवाशाची जेव्हा वैद्यकीय तपासणी सुरु झाली, तेव्हा मात्र त्याने त्याच्या बॅगेत बॉम्ब असल्याचा दावा केला.
मुंबई पोलिसांची चांगलीच दमछाक
बॅगेत बॉम्ब असल्याचा दावा केल्याने मुंबई विमानतळ पोलिसही सतर्क झाले. त्यानंतर लगेच बीडीडीएसमार्फत बॅगेची तपासणी करण्यात आली. (Mumbai News) मात्र, तपासणीनंतर प्रवाशाकडे कोणत्याही संशयास्पद वस्तू आढळून आल्या नाहीत. तसेच, प्रवाशानं दावा केलेल्या बॅगेतही काहीच आढळलं नाही. त्यामुळे बॉम्ब असल्याच्या सर्व अफवाच असल्याचं निष्पन्न झालं.
विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशानं छातीत दुखत असल्याची तक्रार विमानातील क्रू मेंबर्सकडे केली आणि मुंबई विमान लँड करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Mumbai News) मात्र, मुंबई विमानतळावर उतरताच छातीत दुखत असलेल्या प्रवाशाकडूनच त्याच्या बॅगेत बॉम्ब असल्याचा दावा करण्यात आला आणि विमानतळावर एकच गोंधळ उडाला.
औषधांच्या प्रभावामुळे बरळत असल्याचा दावा
प्रवाशाच्या विनंतीवरून विमानचे तातडीनं लँडिंग करण्यात आले. त्यानंतर विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांना पाचारण करण्यात आलं आणि प्रवाशाच्या बॅगेची झडती घेण्यात आली. बीडीडीएस मार्फत बॅगेची तपासणी केली गेली. तपासणीनंतर प्रवाशाच्या बॅगेत काहीच आढळलं नाही. त्यामुळे काही वेळातच यासर्व अफवा असल्याचं लक्षात आलं.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : पुणे पोलिसांकडून माझ्या जिवाला धोका… ललित पाटीलचा कोर्टात खळबळजनक दावा