मुंबई: आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे गटाने भारतीय जनता पक्षाला धक्का देण्याची खेळी केली आहे. भाजपाचे उत्तर मध्य मुंबईचे सचिव सुधीर खातू यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश खूप महत्त्वाचा मानला जात आहे.
या पक्षप्रवेशावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, राजकारणात जो मुख्य प्रवाह असतो, तो विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षात असतो. परंतु, सुधीर खातू यांनी हा प्रवाह उलटा फिरवला आहे. सत्तेत असलेल्या पक्षातून तुमचा प्रवास विरोधी पक्षात नव्हे तर खऱ्याखुऱ्या देशप्रेमी आणि हिंदुत्ववादी पक्षाकडे झाला आहे. आता तुम्ही जे बोलला तीच भावना संपूर्ण महाराष्ट्राची आहे. राज्यातला तमाम हिंदू, मराठी आणि जे जे लोकशाही प्रेमी आहेत ते एकवटले पाहिजेत. आता नाही तर कधीच नाही असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
हेही वाचा:
IND vs AUS: डेव्हिड वॉर्नरने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम, भारताविरुद्ध केली मोठी कामगिरी
अखेर इस्रायलमध्ये अडकलेल्या नुसरत भरुचाशी झाला संपर्क, अडचणीनंतर अभिनेत्री सुरक्षितपणे परतणार भारतात
अफगाणिस्तान भूकंपाने हादरले, मृतांची संख्या 2,000 वर; तालिबानने मदत मागितली