मुंबई : इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कुठंही गेलं तर इंटरनेटचा वापर करणारे अनेक आहेत. पण जेव्हा आपण आपला स्मार्टफोन एअरप्लेन मोडवर टाकतो तेव्हा मात्र इंटरनेट वापरता येत नव्हते. मात्र, आता तुम्हाला एअरप्लेन मोडवरही इंटरनेट वापरता येणार आहे.
एअरप्लेन मोडवर इंटरनेट कसे सुरु करावे हा प्रश्न तुम्हाला पडणे सहाजिकच आहे. अनेकदा स्मार्टफोन एअरप्लेन मोडवर ठेवणे गरजेचे ठरते. पण स्मार्टफोन एअरप्लेन मोडवर ठेवल्याने फोनच्या आधारे करण्यात येणाऱ्या कामाचा जणू खोळंबा होतो. पण आता एअरप्लेन मोड न हटवता, तुम्हाला मोबाईलवर इंटरनेटचा वापर करता येईल.
या ट्रिकचा वापर करा अन् इंटरनेटचा आनंदा घ्या..
- सर्वात अगोदर स्मार्टफोनच्या गुगल प्ले स्टोअरवरून Force LTE Only (4G/5G) हे अॅप डाऊनलोड करावे लागेल.
- हे अॅप डाऊनलोड झाल्यावर ते मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावे लागेल.
- एकदा हे अॅप इन्स्टॉल झाल्यावर 4 पर्याय समोर दिसतील.
- यामधील दुसरा पर्याय METHOD2 : (ANDROID 11+) वर क्लिक करा.
- त्यानंतर फोनच्या इन्फॉर्मेशनमध्ये जा. मोबाईल रेडिओ पॉवर हा पर्याय निवडा.
- मोबाईल रेडिओ पॉवर हा पर्याय इनेबल करा.
- त्यानंतर मोबाईलमधील एअरप्लेन मोड ऑन करा.
- ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हा चमत्कार दिसेल. स्मार्टफोन एअरप्लेन मोडवर असेल. पण त्यातील डेटा सुरू राहिल. तुम्हाला तुमच्या आवडत्या साईटवर जाता येईल. व्हॉट्सऍपसह अनेक सोशल अॅपचा वापर करता येईल. इतकेच नाहीतर युट्यूबवर आपले आवडते व्हिडीओही बघता येतील.