मुंबई : राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील व्यायामशाळेच्या सुविधा अधिक बळकट करण्यासाठी व्यायामशाळा विकास अनुदान 7 लाखांवरून वाढ करून थेट 14 लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती, राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
ग्रामीण व शहरी भागातील व्यायाम शाळा बांधण्यासाठी अनुदान मर्यादा ही 2014 मध्ये 2 लाखांवरून 7 लाख रुपये करण्यात आली होती. त्यानंतर बांधकाम खर्चामध्ये झालेली वाढ लक्षात घेता ही मर्यादा 14 लाखांपर्यंत वाढविण्यात आली असल्याचा शासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे.