मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने देशभरातल्या राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणुकांची घोषणा केली आहे. २७ फेब्रुवारीला राज्यसभा निवडणुकींचं मतदान पार पडणार आहे, यामध्ये महाराष्ट्रातल्या सहा जागांसाठी निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातून ठाकरे गटाचे अनिल देसाई, भाजपचे प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही मुरलीधर, काँग्रेसचे कुमार केतकर तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वंदना चव्हाण यांच्या खासदारकीची मुदत संपणार आहे.
या रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या राज्यातील ६ जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याकडून सुनील तटकरे किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा, भाजपकडून राम शिंदे यांचं नाव चर्चेत आहे.
दरम्यान, राज्यसभेच्या १५ राज्यांतील ५६ जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. तर २९ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील ६ जागांचा समावेश आहे. सध्या या ६ पैकी ३ जागा सत्ताधारी भाजपच्या ताब्यात असून विरोधकांच्या ‘मविआ’तील घटकपक्षांकडेही ३ जागा आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत या पक्षांना आपापले गड राखता येतील का? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम