मुंबई : लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाची बैठक मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली. या बैठकीत नव्याने नियुक्त झालेले निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि ज्ञानेश कुमार उपस्थित होते. या दोघांची नियुक्ती गुरुवारी झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी निवडणूक आयोगाची बैठक झाली. त्यात लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखांबाबत निर्णय घेण्यात आला. आता निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यासाठी शनिवारी (ता. १६) मार्च रोजी दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यात निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार आहे. तारखांची घोषणा होताच आचारसंहिता लागू होणार आहे.
दरम्यान, ही बैठक ४० मिनिटे चालली. या बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही निवडणूक आयुक्त सहभागी झाले होते. त्यात लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखांबाबत निर्णय घेण्यात आला. आता निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यासाठी शनिवारी (ता. १६) दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. त्यात निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार आहे. तारखांची घोषणा होताच आचारसंहिता लागू होणार आहे.
लोकसभेच्या निवडणुकीचे मतदान सात ते आठ टप्प्यात होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात दोन टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात अधिकृत घोषणा निवडणूक आयोगाकडून उद्या १६ मार्च रोजी पत्रकार परिषदेत करण्यात येणार आहेत. तसेच लोकसभा निवडणुकांसोबत ओडिशा, सिक्किम, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेश विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान झाले होते. त्यावेळी वेळी निवडणूक आयोगाने 10 मार्च रोजी तारखा जाहीर केल्या होत्या. पहिल्या टप्प्याचे मतदान 11 एप्रिलला तर शेवटच्या टप्प्यासाठी 19 मे रोजी मतदान झाले. 23 मे रोजी निकाल लागला. त्या निवडणुकीच्या वेळी देशात 91 कोटींहून अधिक मतदार होते, त्यापैकी 67 टक्के मतदारांनी मतदान केले होते.