Rahul Narwekar : मुंबई : शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांचाच असा निर्णय राहुल नार्वेकर यांनी बुधवारी दिला होता.त्यानंतर आज प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत भरत गोगावले यांचाच व्हीप ठाकरे गटाच्या आमदारांनाही लागू होईल, असे वक्तव्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले. माझ्यासमोर असलेला निवडा सोडवताना विधिमंडळ पक्षातील गट आहेत, त्यातील मूळ राजकीय पक्ष आहे. त्यासंदर्भात मी निर्णय दिला आहे. त्यामुळे एका पक्षात दोन व्हीप असू शकत नाही, असे ते म्हणाले.
मी ज्यांची व्हीप म्हणून नियुक्ती केली. त्यांचा व्हीप सर्वांना लागू होईल, असे नार्वेकर यांनी सांगितलं. ठाकरे गटातील आमदार ज्या विधिमंडळ पक्षाच्या गटात आहेत, त्या गटातील प्रतोदाचा व्हीप त्यांना लागेल. म्हणजेच भरत गोगावले यांचा व्हीप ठाकरे गटाला लागू होईल.
काय म्हणाले नार्वेकर ?
सुप्रीम कोर्टानं सुनिल प्रभु यांची नियुक्ती कायमस्वरुपी योग्य ठरवली. गोगावलेंची नियुक्ती अयोग्य ठरवली, असा समज गैरसमज समाजात पसरवला जातोय. कोर्टानं असे म्हटले की, ज्यावेळी नरहळी झिरवळ यांनी सुनिल प्रभू आणि अजय चौधरी यांना निवडलं, त्यावेळी 21 जून 2022 रोजी त्यांच्याकडे फक्त उद्धव ठाकरे यांचं पत्र होतं. त्यावेळी त्यांच्याकडे एकनाथ शिंदे यांचं पत्र नव्हतं. त्यामुळे त्यांना एकच राजकीय पक्ष असल्याचं वाटलं, त्यामुळे त्यांनी दोघांची निवड केली. पण 3 जुलै 2022 रोजी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गोगावले आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबत निर्णय घेतला. त्यावेळी अध्यक्षांकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशी दोघांची पत्रे होती. राहुल नार्वेकर यांना पक्षात फूट पडली अशी कल्पना होती. त्यावेळी राहुल नार्वेकर यांनी केवळ विधिमंडळातील ताकद पाहून गोगावले आणि शिंदेंची केलेली निवड चुकीची आहे. कारण, त्यावेळी नार्वेकरांनी राजकीय पक्ष कोणता आहे हे ठरवायला हवं. त्यामुळे राजकीय पक्ष कुणाचा हे ठरवला, प्रतोद आणि पक्षनेता ठरवल्यामुळे तो भाग चुकीचा असल्याचं सांगितलं. सुप्रीम कोर्टानं सांगितलं की अध्यक्षांनी आता राजकीय पक्ष कुणाचा हे ठरवावं, आणि त्यांनतर प्रतोद आणि विधिमंडळ नेत्यांची निवड करावी. त्यामुळे हा गैरसमज जो पसरवला जात आहे तो अत्यंत चुकीचा आहे मी जो निर्णय दिला आहे तो सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईड लाईन्स पळून १०० टक्के दिला.