पुणे प्राईम न्यूज डेस्क: सध्या आपण अनेक अफेअर्स ऐकतो. अविवाहित असो वा विवाहित असे अफेअर्स आपल्याला पाहिला मिळतात. विवाहित पुरुष अविवाहित तरुणींना डेट करण्याचे ऐकले, वाचले असेलच. पण, तरुणींनो, तुम्ही हे करताना थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे. नाहीतर मोठा फटका बसू शकतो.
जर तुम्ही अविवाहित तरुणी असाल आणि विवाहित पुरुषासोबत संबंध ठेवू इच्छित असाल तर त्याचे घातक परिणाम होऊ शकतात. जेव्हा तुम्ही विवाहित पुरुषाला भेटायला जाता तेव्हा तुम्हाला तुमच्या ओळखीचे कोणीतरी त्याला पाहू शकेल, अशी भीती सतावू शकते. जेव्हा तुम्ही तुमच्या प्रियकराला फोन करता तेव्हा विशेष खबरदारी घ्यावी लागते. कारण, त्याच्या पत्नीने तो फोन रिसीव्ह करू नये म्हणून तुम्हाला वेळ ठरवूनच फोन करणे गरजेचे राहते.
तुम्ही तुमच्या प्रेमाबाबत कितीही गंभीर असलात, जरी तुमच्याशी प्रथम पुरुष जोडीदाराने संपर्क साधला असला, तरीही तुम्ही इतरांच्या नजरेत दुष्ट असे ठरू शकता. तेव्हा तुम्ही डिप्रेशनमध्ये पडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. जेव्हा एखादी मुलगी विवाहित पुरुषाला डेट करते किंवा रिलेशनशिपमध्ये असते, तेव्हा ती हे सार्वजनिकपणे सांगू शकत नाही. हे लपविण्यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्टीत खोटेपणाचा आधार घ्यावा लागू शकतो. त्यामुळे असे संबंध टाळल्यास समंजसपणाचे मानले जाते.