पुणे प्राईम न्यूज: आपण किती काळ जगू शकतो हे जेनेटिक, पर्यावरण आणि आपल्या लाइफस्टाइलवर अवलंबून असते. जीवनशैलीत काही बदल करून माणसाची जगण्याची क्षमता वाढवता येते, असे अनेक संशोधनातून समोर आले आहे. या लेखात आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा तुमच्या जीवनशैलीत समावेश केल्यास तुम्ही जास्त काळ जगू शकता. चला, त्या सर्व गोष्टींबद्दल जाणून घेऊया –
1. बॅलन्स आणि हेल्दी डायट – फळे, भाज्या, लीन प्रोटीन आणि हेल्दी फॅट असलेले पौष्टिक अन्न खाल्ल्याने एकूण आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि तुमचे आयुष्य वाढू शकते.
2.फिजिकल ॲक्टिव्हिटी – दररोज व्यायाम करणे, हे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती योग्य प्रकारे कार्य करते आणि तुमचे एकंदर आरोग्य चांगले राहते.
3.वजनावर नियंत्रण ठेवणे – लठ्ठपणामुळे व्यक्तीला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि त्याचा परिणाम व्यक्तीच्या वयावरही होतो. अशा स्थितीत वजन व्यवस्थित राहण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम करणे गरजेचे आहे.
4.पुरेशी झोप – अपुऱ्या झोपेचा अनेक आरोग्य समस्यांशी संबंध आहे. दररोज 7 ते 9 तासांची झोप घेणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. यामुळे तुमची दीर्घायुष्याची शक्यता वाढते.
5.स्ट्रेस- तणावाचा तुमच्या आरोग्यावर तसेच वयावर खूप वाईट परिणाम होतो. तणावामुळे तुम्हाला अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत तुम्ही तणावावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
6.सोशल कनेक्शन – स्ट्रॉंग सोशल कनेक्शन राखणे हे अत्यंत महत्वाचे आहे. मित्र आणि कुटुंबाबरोबर चांगले नेटवर्क असल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते, ज्यामुळे तुमचे आयुष्य वाढते. मजबूत सामाजिक संबंधांमुळे मानसिक देखील आरोग्य सुधारते.
7.अल्कोहोलचे सेवन मर्यादित करा – जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि आयुष्य कमी होऊ शकते. अल्कोहोलचे सेवन मर्यादित प्रमाणातच करणे देखील महत्वाचे आहे.
पाणी पिणे- हायड्रेटेड राहिल्याने तुमच्या शरीरातील सर्व अवयवांचे कार्य चांगले राहण्यास मदत होते, ज्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहते. दररोज किमान 2 लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा.