सध्या ऑनलाईनचे जग झाले आहे. कोणतीही गोष्ट असो, आपण घरबसल्या ऑनलाईन मिळवू शकतो. त्यातच ऑनलाईन मैत्री अर्थात ऑनलाईन फ्रेंडशिप होण्याचे प्रमाणही वाढत आहे. पण, त्यामध्ये अनेकदा फसवणूक झाल्याचेही आपण ऐकले असेल. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन मैत्री झालेल्या मित्र अथवा मैत्रिणीला भेटण्यासाठी जात असाल तर काही खबरदारी घेणेही गरजेचे बनले आहे.
नातेवाईक किंवा मित्रांना कल्पना द्या
जर तुम्ही एखाद्या मित्राला भेटणार असाल तर तुमच्या कुटुंबीयांना किंवा जवळच्या मित्रांना याविषयी नक्की सांगा. हे त्यांना कळेल की तुम्ही कुठे आणि कोणाला भेटणार आहात. आपण आपले ठिकाण देखील सांगितल्यास ते चांगले होऊ शकते. जेणेकरून ते आपल्याला आवश्यक असल्यास मदत करू शकतील.
संवेदनशील माहिती करू नका शेअर
ऑनलाईन चॅटिंग दरम्यान, बरेच लोक त्यांची वैयक्तिक माहिती त्यात घरचा पत्ता, बँक खाते तपशील, नोकरीची माहिती इत्यादी शेअर करतात, हे खूप धोकादायक असू शकते. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला चांगले ओळखत नाही तोपर्यंत कोणतीही संवेदनशील माहिती शेअर करू नका.
भेटण्यासाठी निवडा सार्वजनिक ठिकाण
यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑनलाईन मित्राला भेटण्यासाठी नेहमी सार्वजनिक ठिकाण निवडा. मॉल, कॅफे, पार्क किंवा कोणतेही रेस्टॉरंट सारखी ठिकाणे सुरक्षित आहेत, जिथे इतर लोक देखील उपस्थित असतात. अनोळखी आणि वेगळ्या ठिकाणी भेटणे टाळा, कारण यामुळे तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो.