नवं नातं जमवून घेताना काही काळजी घ्यावी लागते. पण जेव्हा आपण आपल्या पार्टनर अर्थात जोडीदारासोबत बोलत असतो तेव्हा काय बोलावं हे समजत नसतं. कारण, कोणता शब्द कसा वापरावा हे अनेकदा समजत नसतं. त्यात तुमचं चुकीचं बोलणं तुमच्या रिलेशनशिपवर नकारात्मक परिणाम देणारे ठरू शकते. त्यामुळे पार्टनरसोबत चॅटिंग करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
पार्टनरसोबत चॅटिंग करताना पार्टनरची मोकळ्या मनाने आणि खरी प्रंशसा करा. पार्टनर काय बोलत आहे, त्याचे म्हणणे काय आहे हे शांतपणे ऐकून घ्या. पूर्ण ऐकून घेतल्यावर विचारपूर्वक उत्तर द्या. बोलण्याची किंवा उत्तर देण्याची घाई करू नका. एकमेकांचे विचार वेगळे असू शकतात. त्यामुळे बोलताना एकमेकांच्या भावनांचा विचार नक्की करा. पार्टनरसोबत बोलताना केवळ स्वतःच बोलू नका. समोरच्याला बोलण्याची संधी द्या. चॅटिंग करताना वेळेलाही महत्व आहे. त्यामुळे पार्टनरला मेसेज करण्याआधी वेळ पाहायला विसरू नका.
तुम्ही तुमच्या पार्टनरशी त्याच्या आवडी-निवडी, छंद याविषयी मोकळेपणाने बोला. तसेच चॅटिंग करताना तुमच्या रिलेशनशिपविषयी सकारात्मक राहा. पार्टनरसोबत प्रामाणिकपणे राहा आणि कायम मोकळेपणाने बोला. तुम्ही जसे आहात तसे राहा. उगाचचं चॅटिंग करताना मोठापणा करणे टाळा. कारण, आपण जे आहोत तेच सांगणं हे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरू शकते.