पुरळ अथवा पिंपल्स बहुतेकदा किशोरावस्थेच्या सुरुवातीच्या काळात दिसून येतात. बऱ्याचदा यामुळे त्वचेशी संबंधित समस्या देखील उद्भवतात. पण कधीकधी ते घालवण्याच्या प्रयत्नात आपण आपला चेहरा आणखी खराब करतो. तुम्हीही अशी चूक करत असाल तर ते थांबवण्याची गरज निर्माण झाली आहे.
आपल्या चेहऱ्यावर कोणत्या प्रकारचे पुरळ येत आहेत हे आपल्याला माहित असले पाहिजे. मुरुमांचे काही प्रकार असतात. जर तुम्हाला हे माहित असेल, तर मुरुमांवर उपचार करणे कठीण होणार नाही आणि तुम्हाला त्यांचा जास्त त्रास होणार नाही. मुरुमांमागील कारण स्पष्ट केले गेले आहे. त्यात तेल आणि मृत पेशींमुळे त्वचेचे छिद्र बंद होतात तेव्हा मुरुमे होतात. हे पुरळ सौम्य आणि तीव्र दोन्ही असू शकते. त्यांच्या उपचारांबद्दल जाणून घेण्यासाठी, प्रकार देखील समजून घेतले पाहिजेत.
नोड्युलर पुरळ हा एक भाग आहे. हे दाहक पुरळांपेक्षा जास्त गंभीर असते. या प्रकारच्या मुरुमांमध्ये त्वचेच्या पृष्ठभागाखाली खोल, कठीण गाठी असतात. या गाठी वेदनादायक असू शकतात आणि या गाठींमुळे मोठे चट्टे येऊ शकतात. तसेच कॉमेडोनल मुरुमे या प्रकारच्या मुरुमांमध्ये ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स असतात. हे जास्त प्रमाणात सेबम उत्पादन, बंद छिद्रे आणि मृत त्वचेच्या पेशींमुळे होतात. दाहक पुरळ हे लालसरपणा आणि मुरुमांमुळे दिसून येते. हे सहसा प्रोपियोनिबॅक्टेरियम सारख्या जीवाणूंमुळे होतात. ज्यामुळे संसर्ग होतो. त्यामुळे याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.