पुणे प्राईम न्यूज डेस्क: सध्या आपल्यापैकी बरेच लोक वास्तूशास्त्रावर विश्वास ठेवत असतील. त्यानुसार, घरातील वस्तूंची मांडणी, व्यवस्था करत असतील. त्यात हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला महत्त्वपूर्ण स्थान आहे. घरामध्ये वास्तूच्या नियमांचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे. हे नियम पाळले नाहीत तर वास्तुदोष होतो. घरात राहणाऱ्या सदस्यांना वास्तुदोषांमुळे समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
घरामध्ये कपाट योग्य ठिकाणी ठेवले नाही, तर गरिबीची परिस्थिती देखील उद्भवू शकते. वास्तुशास्त्रात घरामध्ये कपाट ठेवण्यासाठी सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. त्यात वास्तुशास्त्रानुसार घरातील कपाट नेहमी नैऋत्य दिशेला ठेवावे. यामुळे शुभ परिणाम मिळतात. त्यात असे मानले जाते की, या दिशेला कपाट ठेवल्याने आर्थिक समस्या उद्भवत नाही. त्यामुळे घरात नेहमी लोखंडी किंवा लाकडी कपाट ठेवणे शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार चुकूनही दगडी कपाट घरात ठेवू नये, यामुळे नकारात्मकता पसरते आणि घरगुती त्रास वाढतात.
असे जरी असले तरी वास्तुशास्त्रानुसार घरातील कपाट उत्तर-पूर्व दिशेला ठेवू नये. याचा वाईट परिणाम घरात राहणाऱ्या सदस्यांवर होतो. वास्तुशास्त्र म्हणजे, घराची रचना आणि डिझाइन करण्यासाठीच्या तत्त्वांचा समावेश असलेली शास्त्रसंहिता. वास्तुशास्त्रानुसार घरात कोणत्या दिशेला काय असावे, याची काळजी घेतल्याने घरात सुख-शांती आणि सकारात्मक ऊर्जा असते, असे मानले जाते. त्यामुळे कपाटाची दिशा योग्य असणे गरजेचे आहे.