जामखेड: राज्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे राजकीय वातवरण चांगलंच तापलं आहे. आता गावागावात आंदोलनं सुरू असून अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येत आहे. मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा येथे एका युवकाने शोले स्टाईल आंदोलन केलं आहे.
मोबाईल टॉवरवर चढत मिळेपर्यंत खाली उतणार नाही अशी युवकाने घेतली. संतोष साबळे असे आंदोलन करणाऱ्या तरुणाचे नाव असून घटनेची माहिती मिळताच खर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संबंधित तरुणाला खाली उतरण्याची वारंवार विनंती केली जात होती, मात्र युवकाने खाली उतरण्यास ठाम नकार दिला. तरुणाच्या या भूमिकेमुळे प्रशासनाचे चांगलेच धाबे दणाणले.
काही वेळानंतर खर्डा येथे मोबाईल टॉवरवर चढलेल्या संतोष साबळे याला तरुणाला खाली उतरवण्यात ग्रामस्थांना यश आले. ग्रामस्थांच्या विनंतीनंतर संतोष तब्बल एका तासांनंतर मोबाईल टॉवरवरून खाली उतरला. मराठा समाजाला किमान शैक्षणिक आरक्षण द्या, अशी मागणी संतोष साबळे याने यावेळी केली.
दरम्यान मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. या दरम्यान टोकाचे आंदोलन न करण्याचे तसेच कोणीही आत्महत्या करू नये, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
हेही वाचा:
AUS vs NED: ग्लेन मॅक्सवेलने झळकावले विश्वचषकातील सर्वात जलद शतक, एडन मार्करामचा विक्रम मोडला