Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भारतासाठी धोक्याची घंटा? पाकिस्तानच्या लष्कर प्रमुख मुनीरच्या हातात अणुबॉम्बचे बटन; पाक सरकारचा मोठा निर्णय… 

Santosh Mundeby Santosh Munde
Friday, 5 December 2025, 17:10
Warning bell for India? Pakistan Army Chief Munir has nuclear bomb button in his hand; Pakistan government's big decision...

नवी दिल्ली: पाकिस्तानमधील शाहबाज शरीफ सरकार सतत फील्ड मार्शल असीम मुनीर (Pakistan Army Chief Asim Munir)  यांचे अधिकार वाढवत असून, त्यांना नव्याने निर्मित ‘संरक्षण दल प्रमुख’ (CDF) या पदावर औपचारिक नियुक्ती देण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे पाकिस्तानच्या अण्वस्त्रे व क्षेपणास्त्र तंत्रणांच्या नियंत्रणाची शक्ती आता मुनीर यांच्या हातात केंद्रीत झाली आहे.

गेल्या महिन्यातच हे पद तयार करण्यात आले होते, ज्याचा उद्देश लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांमधील समन्वय अधिक मजबूत करणे हा आहे. पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, ही नियुक्ती पाच वर्षांसाठी केली गेली आहे. याचबरोबर, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल झहीर अहमद बाबर यांना दोन वर्षांची मुदतवाढही देण्यात आली आहे.

हेही वाचा: पूनमने एकादशीच्याच दिवशी केले चार खून; नरबळी की तांत्रिक कृत्य? तपासात धक्कादायक खुलासा

फील्ड मार्शल पदावर बढती

मे महिन्यातील ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताने पाकिस्तानचा निर्णायक पराभव केल्यानंतर, पाकिस्तानच्या डीजीएमओंना हस्तक्षेप करीत संघर्ष थांबवण्याची विनंती भारताकडे करावी लागली होती. त्यानंतरही असीम मुनीर यांनी पाकिस्तानभर खोटा विजयप्रचार सुरू ठेवला. या घटनाक्रमानंतर शाहबाज शरीफ यांनी त्यांना फील्ड मार्शल पदावर बढती दिली, ज्यामुळे ते प्रत्यक्षात पाकिस्तानचे ‘अनधिकृत राजा’ झाल्याची टीका होत आहे.

 

‘जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमिटी’ च्या जागी CDF हे पद

CDF हे पद रद्द झालेल्या ‘जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमिटी’च्या अध्यक्षांच्या जागी आणले असल्याची माहिती उपलब्ध आहे. राष्ट्रपतींनीही मुनीर यांच्या या नियुक्तीचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या असून, त्यांच्या संमतीमुळे या प्रक्रियेत विलंब होईल अशा अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. मुनीर यांची 2022 मध्ये लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती झाली होती, तर 2024 मध्ये त्यांच्या कार्यकाळात पाच वर्षांची वाढ करण्यात आली.

अण्वस्त्र नियंत्रण प्रणालीची सूत्रेही आता त्यांच्या हातात

संरक्षण दल प्रमुख पदामुळे असीम मुनीर यांच्याकडे प्रचंड सत्ता एकवटली आहे. अण्वस्त्रे असलेल्या पाकिस्तानमध्ये या प्रकारचे हे नवे आणि अत्यंत प्रभावी लष्करी पद असून, तीनही सैन्यदलांचे अधिकार आणि नियंत्रण यामुळे एकाच व्यक्तीकडे केंद्रीत झाले आहे. तसेच, देशाच्या अण्वस्त्र नियंत्रण प्रणालीची सूत्रेही आता त्यांच्या हातात आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांना फील्ड मार्शल पदावर बढती देण्यात आली होती, जे पाकिस्तानच्या इतिहासातील फक्त दुसरे उदाहरण आहे. यापूर्वी जनरल अयुब खान यांना हे पद देण्यात आले होते. 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धात पराभव पत्करूनही त्यांचे ‘सन्मान’ करण्यात आले होते.

शाहबाज सरकार असीम मुनीर यांच्यावर केलेली ही उदार कृपा अनेकांच्या टीकेचा विषय ठरत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या सैन्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी होत असतानाही सरकार त्यांना सतत नव्या सत्तास्थानी बसवत असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा: प्री-प्लॅन्ड मर्डर! सक्षम ताटे हत्याकांडाचा ‘थरार’ उघड; आरोपीने हत्त्येआधी घराबाहेर…. CCTV फुटेज आले समोर

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पुण्यात नव्या ‘MH 61’ मालिकेची धूम; अवघ्या ७ दिवसांत दुचाकींची सिरीज संपली, ‘९’ नंबरसाठी ३ लाखांहून अधिक बोली

Tuesday, 8 September 2026, 22:50

गणेशोत्सवातील मद्यविक्रीबंदीच्या नियमात तफावत! पुण्यात फक्त ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच ‘ड्राय डे’; पुणे पोलिसांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 8 September 2026, 22:07

घरातल्यांचा विरोध असतांनाही प्रेमविवाह केला! पुण्यात भररस्त्यात मुलीच्या भावाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात गाठलं अन्….

Tuesday, 8 September 2026, 21:15

बारामतीत लाचेचा पर्दाफाश! क्लासेसवर कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने मागितली तब्बल ७ लाखांची लाच; ACB कडून रंगेहाथ अटक

Tuesday, 8 September 2026, 20:19

मोदींच्या कार्यक्रमस्थळी खळबळ; बनावट PMO अधिकारी अन् बंदूकधारी बॉडीगार्ड ताब्यात

Tuesday, 8 September 2026, 20:01

संतोष पंडितांवर कायदेशीर कारवाईचा फास घट्ट!कोर्टात हजेरीनंतर आता कारागृहात रवानगी,प्रकरणाला नवं वळण!

Tuesday, 8 September 2026, 19:47
Next Post
Pune Crime: 24-year-old girl commits suicide after being cheated on the promise of marriage; Case registered against young man

Ahilyanagar Suicide: नृत्यांगना दिपाली पाटील हीची गळफास घेऊन आत्महत्या, परिसरात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp