Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : येथील महात्मा गांधी विद्यालय व जुनिअर कॉलेज मधील १९ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने विभागीय पातळीवरील डॉजबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. विजयी संघाची लातूर जिल्ह्यात होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य भारत भोसले यांनी दिली.
राज्यस्तरावर निवड
क्रीडा युवक संचनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा कार्यालय पुणे यांच्यातर्फे १७ ते १९ वर्ष वयोगटातील मुलांच्या डॉजबॉल स्पर्धेचे आयोजन शुक्रवारी (ता. २०) वाडेबोल्हाई (ता. हवेली) येथील जोगेश्वरी माता माध्यमिक विद्यालयात करण्यात आले होते.
यासाठी विभागातून नगर ग्रामीण व शहर सोलापूर ग्रामीण व शहर पुणे ग्रामीण व शहर आणि पिंपरी चिंचवड असे जिल्ह्यातून प्रथम आलेले संघ विभागीय स्पर्धेसाठी सहभागी झाले होते. या स्पर्धेत उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवून आहे. या विजयी संघाची राज्यस्तरावर निवड झाली आहे.
विजयी संघातील ऋषिकेश जाधव, गणेश चौधरी, राहुल भंडारी, कौशल कांबळे, वैभव बीटे, सार्थक भोंगे, शिवकुमार गुप्ता, साई कड, शुभम सावंत, रविराज लाडे, भांडवलकर आदि होते. या विजयी खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक संगीता शिर्के, साहेबराव कुंभारकर, कृष्णा गुंड, नवनाथ कांचन यांनी मार्गदर्शन केले.
दरम्यान, विद्यालयाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या नावलौकिकात भर पाडली आहे. महात्मा गांधी सर्वोदय संघाचे पदाधिकारी व सर्व विश्वस्त तसेच विद्यालयाचे प्राचार्य भारत भोसले, उपप्रमुख गो.ग. जाधव सर्व पर्यवेक्षक तसेच क्रीडा अध्यापक यांनी यशस्वी खेळाडूंचे कौतुक केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.