पुणे- किर्र झाडी, वरुन पडणारा जोरदार पाऊस, बोचरी थंडी, धुके आणी त्यात भर म्हणजे सगळीकडे अंधार अशा वातावरणात भीमाशंकर अभयारण्यात रात्रीच्या वेळी रस्ता चुकलेल्या उल्हासनगर येथील सहा ट्रेकर्सला घोडेगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने व त्याच्या सहकाऱी व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने स्वतःचा जीव धोक्यात घालुन अवघ्या चार तासाच्या जंगलातुन शोधुन सुखरुप बाहेर काढले.
सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने व त्याच्या सहकाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालुन जंगलात धाव घातल्याने, वरील सहा जणांचे प्राण वाचु शकले. रात्रीच्या वेळी कोणीही मदतीला येण्याची आशा सोडुन दिलेल्या वरील सहा जणांना सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवण माने यांनी मृ्त्युच्या दाढेतुन बाहेर काढल्याने, माने यांची कामगीरी लईच दमदार असे शब्द सहा जणांच्या तोंडुन पडले नसतील तर नवलच..
पवन अरूण प्रतापसिंग (वय-२६), सर्वेश श्रीनिवास जाधव (वय – २६), निरज रामराज जाधव (वय-२८), दिनेश धर्मराज यादव (वय- २३), हितेश श्रीनिवास यादव (वय-२५), अंकुश सत्यप्रकाश तिवारी (वय – २३) ही त्या सहा तरुणांची नावे आहेत.
उल्हासनगर येथील पवन प्रतापसिंग यांच्यासहा वरील सहा तरुण शनिवारी पायी चालत श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दर्शन व पर्यटनासाठी आले होते. दुपारी दोन वाजनेच्या सुमारा म्हसे गावापासुन पवन प्रतापसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी भीमाशंकर अभयारण्यातु पायी चालण्यास सुरूवात केली. रस्त्यावर असलेल्या पाऊलवाटेने श्री क्षेत्र भीमाशंकरकडे पायी चालत राहिले. मात्र जोरदार पाऊस, बोचरी थंडी, धुके तर दुसरीकडे काळाकुट्ट अंधार जंगलात अंधार अशा वातावरणात वरील सहा जणांना सायंकाळी पाच वाजनेच्या सुमारास रस्ता चुकल्याची जाणिव झाली. यावेळी वरील तरुणांनी ही बाब एका मित्राला कळवली. यावर संबधित मित्रानेही वरील बाब जीवन माने यांना फोनवरुन कऴवली.
उल्हासनगर येथील तब्बल सहा तरुण जंगलात वाट चुकल्याची माहिती मिळताच जीवण माने व सहकारी कांही स्थानिक ग्रामस्थांच्या समवेत तरुण रस्ता चुकलेल्या ठिकाणी पोचले. तसेच पोलिसांनी स्थानिक नागरीकांच्या मदतीने रात्रीच्या अंधारात बॅटरीच्या उजेडात सहा तरूणांना शोधण्यास सुरूवात केली. एकतर अंधार त्यात मुसळधार पाऊस अशा वातावरात डोंगर उतरून शोधकार्य सुरू होते. अखेर चार तासांच्या प्रयत्नानंतर बैलघाट येथील खोल दरीत वरील सहा तरुण सुखरुप मिळाले. त्यांना भीमाशंकर येथे सुखरूप आणले.