पुणे : पाळीव प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आता राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.नगर विकास विभागाने याबाबत शासन आदेश जारी करत प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीची व्यवस्था करण्यास सांगितले आहे.
राज्य शासनाने काढलेल्या आदेशात पाळीव प्राण्यांच्या मृत्यूनंतर अनेकदा प्राण्यांचे मृतदेह हे खाडी, तलाव, मोकळ्या जागा, पाण्याची डबकी किंवा रस्त्यावर फेकले जातात. मृतदेहांची योग्य विल्हेवाट न लावल्याने बऱ्यचदा दुर्गंधी सुटते. त्याचा सर्वांनाच त्रास होतो आणि रोगराई पसरण्याचा धोका देखील असतो. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारी पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे नमूद केले आहे.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी याप्रकरणी 25 जुलै 2023 रोजी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आता पाळीव प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीची व्यवस्था करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.