माढा : उक्कडगाव (ता. बार्शी) येथील डॉ. चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी सोहम शिवाजी तळेकर याने राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षेत (नीट) ७२० पैकी ६३२ गुण व सीईटीच्या परीक्षेत ९९.६० टक्के गुण प्राप्त केले आहेत. व कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल संस्थापक प्रा. डॉ. संजीव सोनवणे व प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. शिवाजी काळगे यांच्या हस्ते सोहमचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
सोहम तळेकर हा मुळ राहणार देवडी (ता. मोहोळ) येथील आहे. कोरोनाच्या संकटाच्या काळातही प्रयत्न, चिकाटी, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ऑनलाईन व ऑफलाईन तासिकाद्वारे अभ्यास करीत हे उत्तुंग यश मिळवले आहे. विशेष बाब म्हणजे त्याने कोठेही खाजगी शिकवणी लावली नव्हती तरी त्यांनी दोन्ही पात्रता परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त केले आहे.
यावेळी प्राचार्य अंकुश पांचाळ, मुख्याध्यापक शिवाजी तळेकर, नगरसेवक शरद फुरडे, प्राध्यापक विशाल गरड, शशिकांत तरटे, पियुष पाटील विक्रम पवार, सुशील अबंदे, सलमान सय्यद, आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड, शांताबाई गुंड, जलवंती तळेकर, यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, सोहमने दोन्हीही परीक्षेत उल्लेखनीय यश संपादित केल्याबद्दल विठ्ठलवाडी (ता. माढा) येथील गुंड परिवाराच्या वतीने त्याचा व त्याच्या कुटुंबियांचा सत्कार सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड व आजी शांताबाई गुंड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक शिवाजी तळेकर, आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड, सुधीर गुंड, जलवंती तळेकर, उर्मिला पासले, मेघना गुंड, प्राथमिक शिक्षिका माधुरी गुंड, दिपक तळेकर, राजवर्धन गुंड, शिवम गुंड, मेघश्री गुंड, समृद्धी गुंड यांच्यासह नातेवाईक उपस्थित होते.