नागपूर : नागपूरच्या हिंगणा टी पॉईंटवर एका सात वर्षीय मुलाला ट्रॅकने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिकवणी वर्ग आटपुन घरी परतताना चिमुकल्यावर काळाने घाला घातला आहे.आहान नायक असे या सात वर्षीय मुलाचे नाव आहे.आई आणि बहिणीच्या डोळ्यादेखत आहानचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, आहान सुरज नायक( 7 वर्ष,) हा शिकवणीचा वर्ग संपल्यानंतर आपल्या आईसोबत आणि बहिणी सोबत रिक्षातून घरी येत होता. घराजवळ आल्यानंतर रिक्षातून ते खाली उतरत होते तेवढ्यात आहानला भरघाव ट्रकने चिरडले. या अपघातानंतर जखमी अस्वस्थेत असलेल्या आहानला स्थानिकांनी रुग्णालयात भरती केले. मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. एमआयडीसी पोलिसांनी ट्र्क चालकाला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. मात्र या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
रिक्षावाल्याला पैसे देत असताना नागपूरकडून हिंगणाकडे जाणाऱ्या एका भरगाव ट्रकने आहानला जोरदार धडक दिली.त्यानंतर तो ट्रकच्या समोरील चाकाखाली आला त्यानंतर काही अंतर आहानला फरपटत घेऊन गेला या अपघातामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.